ICHMH51NEWS.IN
9921600800

कन्या महाविद्यालयात संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे जयंती मोठ्या उत्साहात साजरी…..

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कन्या महाविद्यालयात संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे जयंती मोठ्या उत्साहात साजरी…..

इचलकरंजी
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयांमध्ये संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांची 99 वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणामध्ये साजरी झाली.
या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. श्रुती जोशी यांच्या हस्ते सर्वप्रथम वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  मराठी विभागप्रमुख डॉ. अनिता आंबोकर यांनी संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी सौ.शिल्पा भोसले लिखित समर्पिता या ग्रंथाचे अभिवाचन करण्यात आले. यामध्ये डॉ. प्रतिभा पैलवान, प्रा. प्रियांका साळोखे डॉ.सोमनाथ काळे, कु. सायली पाटील यांनी सहभाग घेतला.

यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. श्रुती जोशी यांनी संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या अनेक आठवणी विद्यार्थिनींना सांगितल्या आणि त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
त्यागमूर्ती,समर्पिता संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या सोबत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था नामक रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करण्यासाठी आपले भरीव योगदान दिले आहे.त्या कधीही कोणत्या व्यासपीठावर आल्या नाहीत किंवा कोणत्या कार्यक्रमांमध्ये समोर आल्या नाहीत पण पडद्यामागे राहून त्यांनी बापूजींना बळ देण्याचं काम केलं.आजही संस्थेच्या लाखो विद्यार्थ्यांच्या प्रेरणास्थानी संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे नक्कीच आहेत. आज संस्थेच्या सर्वच शाखांमध्ये त्यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सांगता डॉ. प्रतिभा पैलवान यांच्या आई या भावपूर्ण कवितेने झाली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि संयोजन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. सुधाकर इंडी यांनी केले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा