आपटे वाचन मंदिर तर्फे शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर
इचलकरंजी – येथील शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी आपटे वाचन मंदीर, इचलकरंजी यांच्यातर्फे देण्यात येणारे शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत. प्रतिवर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतभर शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करून सन्मानित केले जाते. या निमित्त आपटे वाचन मंदिर तर्फे पुरस्कार जाहीर केले जातात. शिक्षक पुरस्कार पुढीलप्रमाणे यावर्षी डॉ. श्री. विनायक गायकवाड (डी. के. टी. ई. टेक्स्टाईल महाविद्यालय, इचलकरंजी), डॉ. श्री. राहुल कुलकर्णी (गोविंदराव हायस्कूल आणि ज्यूनियर कॉलेज, इचलकरंजी), सौ. हेमांगी वडेर (श्री अण्णासाहेब डांगे कनिष्ठ महाविद्यालय, हातकणंगले), सौ. वर्षा निशाणदार (श्री गंगामाई विद्या मंदिर ,इचलकरंजी), सौ. लता चौगुले (श्री शांतिनाथ बाल विद्या मंदिर ,इचलकरंजी)
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






