इमनपा शिवशाहू आघाडीतर्फे स्वीकृत नगरसेवक पदी अभिजित रवंदे यांचा अर्ज दाखल.
इचलकरंजी :
शिव-शाहू विकास आघाडीचे नेते तथा आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी महानगरपालिकेतील रिक्त स्वीकृत नगरसेवक पदासाठी इचलकरंजी शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवक अध्यक्ष अभिजित आनंदराव रवंदे यांच्या नावाची एकमताने निश्चिती करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नेते मदनराव कारंडे, सागर चाळके, शशांक बावचकर, संजय चौगुले, प्रकाश मोरबाळे, सदाशिव मलाबदे, रवींद्र गोंदकर आणि हेमंत वनकुंद्रे यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला. याबाबतची अधिकृत घोषणा शिव-शाहू विकास आघाडीचे गटनेते तथा इचलकरंजी महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी केली.
अभिजित रवंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. युवकांच्या प्रश्नांसाठी तसेच शहरातील विविध नागरी समस्यांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठविला आहे. युवकांचे संघटन मजबूत करण्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
स्वीकृत सदस्य पदासाठी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते, शिव-शाहू विकास आघाडीचे सर्व नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे अर्ज सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती उदयसिंग पाटील यांनी दिली.
इचलकरंजी महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रभावीपणे काम करण्याची संधी अभिजित रवंदे यांना मिळणार आहे. त्यांच्या निवडीमुळे शिव-शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून युवकांना प्रतिनिधित्व मिळाल्याची भावना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
युवकांच्या प्रश्नांना सक्षम व्यासपीठ मिळवून देत शहराच्या विकासासाठी सकारात्मक व अभ्यासपूर्ण भूमिका मांडण्याचे काम अभिजित रवंदे करतील, असा विश्वास शिव-शाहू विकास आघाडीच्या नेते व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी नगरसेवक तथा शिवसेना शहरप्रमुख व गटनेते शिवाजी पाटील, सयाजी चव्हाण, राजू आलासे आणि रतन वाझे उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






