ICHMH51NEWS.IN
9921600800

डीकेएएससी महाविद्यालयात बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या नियोजित पुतळ्यांचे भूमिपूजन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेएएससी महाविद्यालयात बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या नियोजित पुतळ्यांचे भूमिपूजन

इचलकरंजी : येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयाच्या परिसरात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या नियोजित पुतळ्यांचा भूमिपूजन समारंभ श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.

यावेळी महाविद्यालयाचे सीडीसी सदस्य सुनील पाटील, संस्थेचे आजीव सेवक भूपाल कुंभार, आर. ए. भोजकर, आजीव सेवक प्राचार्या डॉ. श्रुती जोशी, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) एस. के. खाडे, दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सी. एस. बागडी, सेवानिवृत्त प्राध्यापक एम. एम. कांबळे व व्ही. बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले, “शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांनी रुजविलेल्या ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कारांचा वारसा जपणे ही काळाची गरज आहे. बापूजींना अभिप्रेत असलेली सुसंस्कृत पिढी निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा. महाविद्यालय परिसरात उभारण्यात येणारे हे पुतळे भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरतील.”

कार्यक्रमाची सुरुवात बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमापूजनाने झाली. यावेळी महाविद्यालयाचे दुपार सत्र प्रमुख प्रा. डी. ए. यादव, सकाळ सत्र प्रमुख प्रो. डॉ. सुभाष जाधव, डॉ. प्रभा पाटील, प्रा. लेफ्टनंट विनायक भोई, डॉ. सुचय खोपडे, प्रबंधक रघुनाथ जोग यांच्यासह गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) एस. के. खाडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. रोहित शिंगे यांनी केले.

भूमिपूजन करताना मा.अभयकुमार साळुंखे,प्रा.एस के खाडे व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा