प्रतिबंधित गुटखा प्रकरणी दोघांना अटक; सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त
इचलकरंजी, दि. ६ : राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याचा साठा करून विक्री करणाऱ्या दोघा आरोपींना शिवाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. या कारवाईत प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ, पानमसाला तसेच गुन्ह्यात वापरलेली वॅगनआर कार असा सुमारे सव्वादोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर बंडगर माळ येथील तारामाई पान शॉप येथे सकाळी कारवाई करण्यात आली. त्यानंतर वेताळ पेठ येथील एका घरासमोर उभ्या असलेल्या वॅगनआर कारच्या डिक्कीतून प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला.
याप्रकरणी अब्दुल जब्बार पोट्टाचोला (वय ६०, रा. बंडगर माळ) व अमर मनोहर घडवीर (वय ४७, रा. वेताळ पेठ) यांना अटक करण्यात आली असून दर्शन चौगुले (रा. बोरगाव, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) हा फरार आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या पथकाने केली. महिला पोलीस उपनिरीक्षक आरती कणिरे या पुढील तपास करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






