लॉजिस्टिक धोरणाचा वस्त्रोद्योगास फायदा-चंद्रकांत पाटील
इचलकरंजी
राज्य शासनाच्या लॉजिस्टीक धोरणामुळे इचलकरंजी-कोल्हापूर हबची स्थापना होणार आहे. त्याचा इचलकरंजीतील ग्रे व तयार कापड तसेच गारमेंट निर्यातीसाठी मोठा फायदा पुढील काळात होणार आहे. त्याचा लाभ यंत्रमागधारकांनी करून घ्यावा, असे आवाहन दि इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स को-ऑप. असोशिएशनचे चेअरमन चंद्रकांत पाटील यांनी केले.
दि इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स को-ऑप. असोशिएशन या संस्थेच्या ७६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अहवाल वाचन करताना चेअरमन पाटील बोलत होते. याप्रसंगी आमदार प्रकाश आवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
चेअरमन पाटील यांनी, नामदार दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखालील व आमदार प्रकाश आवाडे सदस्य असलेल्या समितीच्या अहवालामध्ये लाईट बिलाची सवलत, साध्या यंत्रमाग उद्योजकांना ५ टक्के व शटललेस उद्योजकांना २ टक्के कर्जावर व्याज सवलत, मल्टीपार्टी वीज कनेक्शन पूर्ववत करणे, सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी, नविन वीज कनेक्शन, यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ, मिनी टेक्स्टाईल पार्क, भांडवली अनुदान योजना, क्लॉथ व यार्न बँक, प्रोसेसिंग युनिट उभारणे, साध्या यंत्रमागावरील उत्पादनास आरक्षण, शिक्षण व प्रशिक्षण, सांडपाणी प्रक्रिया, इ. शिफ ारशी केलेल्या आहेत. यातील कांही शिफारशींना मान्यता मिळून त्याच्या कामास सुरूवात करणेत आली असल्याचे सांगितले.
प्रारंभी स्वागत असोशिएशनचे माजी चेअरमन सतीश कोष्टी यांनी केले. त्यानंतर नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन इनचार्ज सेक्रेटरी एस. डी. जोशी यांनी केले. सूत्रसंचालन तीर्थंकर माणगांवे यांनी केले. तर आभार असोशिएशनचे व्हाईस चेअरमन रफिक खानापुरे यांनी मानले.
याप्रसंगी सुनिल पाटील, विश्वनाथ अग्रवाल सर्जेराव पाटील, चंद्रकांत इंगवले, अहमद मुजावर, सुभाष जाधव, बंडोपंत लाड, नरसिंह पारीक, गजानन होगाडे यांच्यासह संचालक राजगोंडा पाटील, सोमा वाळकुंजे, चंद्रकांत भोपळे, पांडुरंग सोलगे, सुभाष बलवान, दत्तात्रय टेके, किरण पोवार, राजाराम गिरी, श्रीमती हमिदा गोरवाडे, महादेवी खोत आदींसह सभासद उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800