सुनील महाजन युवा शक्ती व रवींद्र माने युथ फोर्स च्या वतीने भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन
इचलकरंजी
माजी उपनगराध्यक्ष श्री सुनील महाजन व शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख श्री रवींद्र माने यांच्या नेतृत्वाखालील सुनील महाजन युवा शक्ती व रवींद्र माने युथ फोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २९ ऑगस्ट २०२४ रोजी राधाकृष्ण चौक, इचलकरंजी येथे भव्य दहीहंडीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत या मध्ये दहीहंडी फोडणाऱ्या मंडळास १,५१,००१ ₹ चे बक्षीस व आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे व या स्पर्धेत महिला (गोपिका) यांना देखील दहीहंडी फोडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे महिलांच्या तर्फे जे मंडळ दहीहंडी फोडतील त्यांना १,००,००१ ₹ चे बक्षीस व आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे या स्पर्धेची सुरवात संध्याकाळी ठीक ५ वाजता होईल
या स्पर्धे करीता खास मुंबईहून महिला गोविंदा (गोपिका) पथक दहीहंडी फोडण्याकरिता येणार आहे हे या स्पर्धेचे विशेष आकर्षण असणार आहे
या स्पर्धेसाठी हातकणंगले लोकसभेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर इत्यादी सह राजकीय, सामाजिक, व्यापारी वर्गातील अनेक गणमान्य व्यक्ती उपस्थित राहणार आहेत
या कार्यक्रमात केशरी ढोल ताशा पथक, डिजे साऊंड सिस्टीम, आकर्षक एलईडी लाईट इफेक्ट्स, जोरदार आतिषबाजी ची व्यवस्था करण्यात आली आहे व सूत्र संचालन साठी खास पुण्याहून दीप्ती हलवाई या येणार आहेत
या दहीहंडीच्या कार्यक्रमा साठी रुग्णवाहिका (अँबुलन्स) सेवा व वैद्यकीय सेवा अथायू हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या वतीने पुरवण्यात येणार आहे
तरी या भव्य दिव्य आकर्षक अश्या दहीहंडीच्या कार्यक्रम चा आंखो देखा हाल बघण्यासाठी इचलकरंजी शहर आणि परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन दहीहंडी संयोजकांच्या वतीने करण्यात आला आहे

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800