छत्रपतींचा पुतळा व महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत माविआकडून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न. भाजपाचे निषेध आंदोलन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

छत्रपतींचा पुतळा व महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत माविआकडून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न.

भाजपाचे निषेध आंदोलन

इचलकरंजी
 छत्रपतींच्या पुतळ्याच्या व महिलांवरील अत्याचारांच्या दुर्घटनेनंतर विरोधक राजकारण करत असल्याच्या निषेधार्थ इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर पुर्व भाजपने आंदोलन केले.वातावरण बिघडू पाहणाऱ्या नेत्यांचा निषेध करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी इचलकरंजीच्या वतीने महात्मा गांधी चौकात महाविकास आघाडीच्या विरोधात निषेध आंदोलन छेडण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टिका करत भाजपा कार्यकर्त्यांनी टीकात्मक आंदोलन केले.महाविकास आघाडीच्या नेत्यांवर चौफेर टीका करण्यात आली.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी… अशा जोरदार घोषणा भाजपा कार्यकर्त्यांनी दिल्या. राज्य व जिल्ह्यांतील वातावरण दुषित करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यामहाविकास आघाडीच्या नेत्यांचा निषेध करण्यात आला.
भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक म्हणाले की, राजकोट किल्ल्यावर छत्रपतींचा पुतळा दुर्घटना झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राजकारण करण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली त्यानंतर देखील विरोधक राजकारण करत आहेत. शिवप्रेम विरोधकांनी दाखवण्याची गरज नाही. गड किल्ले आणि छत्रपतींचा इतिहास जागृत ठेवण्याचे काम आम्ही करत आहोत.ज्यावेळी विशाळगडावर अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न चालू होता, तसेच कलकत्त्यातील डॉक्टर वरील अत्याचारावेळी तुम्ही कुठे होता? कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यानंतर छत्रपतींचा पुतळा हटवण्यात आला. त्यावेळी तुम्ही कुठे होता? अपघाताने पुतळा पडलेला आहे, त्यावर राजकारण करण्याची गरज नाही.या घटनेबाबत राज्यातील जनता विरोधकांना माफ करणार नाही. विरोधकांनी सातत्याने गलिच्छ राजकारण केल्यामुळे ही बातमी देशभर पसरण्याचं काम करत छत्रपतींच्या अपमान विरोधक करत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जनता त्यांना जागा दाखवून देईल, हा अपमान छत्रपतींचा असल्यामुळे तुम्हाला जनता सोडणार नाही असा इशारा दिला. या आंदोलनात महाविकास आघाडीतील नेत्यांचे निषेध व्यक्त करणारे फलक व भारतीय जनता पार्टीचे झेंडे घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते.  भाजप,महिला मोर्चा युवा मोर्चा यांनी आंदोलन केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी ,भाजप शहराध्यक्ष पैलवान अमृत मामा भोसले, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ.अरविंद माने, जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस नामदेव सातपुते  सरचिटणीस राजेश रजपुते,महिला मोर्चा शहराध्यक्ष अश्विनी कुबडगे, युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड, उपाध्यक्ष महेश पाटील, अरुण कुंभार, उमाकांत दाभोळे किसन शिंदे युवा मोर्चा शहर सरचिटणीस हेमंत वरुटे, प्रवीण पाटील,युवा मोर्चा मनोज तराळ,दीपक कडोळकर,अर्जुन सुतार,अनिस म्हालदार,नितीन पंडियार,सिद्धलिंग बुक्का, जयदीप पाटील, आशिष खंडेलवाल, रवींद्र घोरपडे, अर्जुन सुतार, सुनिल कोरवी,मनोज जाधव, हर्षवर्धन गोरे, संजय गेजगे, सुधाकर हेब्बाळे, सचिन पवार, चिदानंद कोटगी, नीता भोसले, सुप्रिया मजले,वर्षा कांबळे, नागूताई लोंढे, माधवीताई मुंडे अमिता बिरंजे, शबाना शहा , रेश्मा शेख यांच्यासह कार्यकर्ते महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More