महेश मानव सेवा संस्थेच्या आरोग्य सेवा केंद्र वास्तूचे लोकार्पण.२ महिन्यात अत्यल्प दरात डायलिसीस सेवा सुरू होणार.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महेश मानव सेवा संस्थेच्या आरोग्य सेवा केंद्र वास्तूचे लोकार्पण.२ महिन्यात अत्यल्प दरात डायलिसीस सेवा सुरू होणार.

इचलकरंजी
इचलकरंजी मँचेस्टर सिटी म्हणून संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे रोजगाराच्या शोधात अनेक लोक पेथे वास्तव्यास आलेले आहेत. अतिशय गरीब परिस्थितीत हे लोक आपला उदरनिर्वाह करतात. त्यांना आजारी पडल्यास मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी पैसे नसतात,याचा विचार करून समाजातील दानशूर व्यक्तींनी “महेश मानव सेवा संस्था” या नावाने एक रोपटे लावले. त्याच रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे.या संस्थेच्या नूतन वास्तूचा आज लोकार्पण सोहळा इचलकरंजीत जुने एस टी स्टॅण्ड समोर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
जानेवारी २०१५ मध्ये समाजातील काही लोकांनी इचलकरंजी शहरामध्ये गरीब लोकांची सेवा करण्याची कल्पना केली. १६ मे २०१५ रोजी “महेश मानव सेवा संस्था” या नावाने एक संस्था रजिस्टर केली. सर्व प्रथम डिसेंबर २०१५ पासुन आयजीएम हॉस्पीटल मध्ये पेशंट लोकांना २ वेळेचे उत्तम दर्जाचे जेवण मोफत मध्ये देण्याची सुरुवात केली.२०१८ मध्ये तीन बत्ती चौक व लिंबू चौक या ठिकाणी मोफत ओपीडी केंद्र सुरू केली.
२०१९ मध्ये कोरोना नंतर सदर ओपीडी बंद करून परत आयजीएम मध्ये सकाळचा चहा,नाश्ता,दुपारचे जेवण,दुपारी चहा,संध्याकाळी जेवणाचे वाटप मोफत सुरू करण्यात आले. २०२२ मध्ये संस्थेच्या सभासदांनी स्वतःची बिल्डिंग उभारावी व त्यामध्ये एक डायलिसिस सेंटर सुरू करावे असे ठरवले.लगेचच २०२३ मध्ये जुन्या एसटी स्टँड परिसरात ७००० स्क्वेअर फुट जागा घेऊन येथे इमारत उभी करण्यात आली.या इमारतीसाठी समाजातील दानशूर ६१ दात्यांनी निधी दान स्वरूपात उपलब्ध करून दिला. त्याच वास्तूचे लोकार्पण होत झाले.सदर इमारतीमध्ये पुढील आठवड्याभरात ओपीडी सुविधा गोरगरीब लोकांसाठी सुरू करण्याचा संस्थेच्या सभासदांचा मानस आहे.तसेच पुढील दोन महिन्यात येथे डायलिसिस सेंटर ही सुरू करण्यात येणार आहे.५ बेडचे सेंटर सुरवातीला सुरू करत असून १० बेडपर्यत क्षमता आहे.त्याचबरोबर अतिशय माफक दरात अत्याधुनिक टेस्टिंग लॅबची ही येथे उभारणी केली जाणार आहे. हे सर्व माहेश्वरी समाजातील उच्चशिक्षित लोकांनी शहरवासीयांची सेवा आणि कर्मभूमीसाठी योगदान देण्याच्या
भावनेतून साकारले आहे. या संस्थेमध्ये १३० सभासद आहेत. या सर्व आरोग्य सेवांचा गरजु नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान संस्थेचे अध्यक्ष वेणुगोपाल मुंदडा, उपाध्यक्ष घनश्यामदास तोतला, सचिव रामगोपाल मालानी, प्रोजेक्ट चेयरमैन राधेश्याम बंग,कोर कमिटी सदस्य ओमप्रकाश छापरवाल, शिवभगवान तोष्णीवाल, सत्यनारायण रादंड,कार्यकारिणी सदस्य रामनिवास मुंदडा, प्रल्हादराज भुतडा,गिरीराज मोहता,नितीन धूत, श्रीवल्लभ बांगड,रामपाल भंडारी,ओमप्रकाश दरक,कैलासचंद लड्डा,कमलेशकुमार राठी,वेणूगोपाल तोष्णीवाल,प्रेमराज लोया,वल्लभदास जाखोटीया, श्यामसुंदर धूत यांनी केले आहे.
इचलकरंजी शहरासाठी महत्वपूर्ण योगदान-
आमची जन्मभूमी राजस्थान असली तरी कर्मभूमी इचलकरंजी आहे त्याची आम्हा सर्वांना जाणीव असून डायलिसिस सारख्या उपचार पद्धतीचा खर्च जास्त आहे,ही सुविधा अत्यल्प दरात देऊन रुग्णाचे कोल्हापूर सांगली येथील हेलपाटे वाचवणार आहोत.आधुनिक तंत्रज्ञान असलेली मशिनरी आणुन २ महिन्यात सेवा सुरू करण्याचा मानस आहे.इचलकरंजी शहरासाठी चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा उपलब्ध करून देताना कर्मभूमीसाठी योगदान दिल्याचे समाधान वेगळे असल्याचे सांगताना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आवर्जुन सांगितले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

One Response

  1. फार स्तुत्य उपक्रम. शासनाने सुध्धा या अशा संस्थांना वेगवेगळ्या योजनेतून सहकार्य करून मदत करावी ज्यामुळे गोरगरीब लोकांना त्याचा भ्रष्टाचार न होता फायदा होईल. सदर मंडळींना इचलकरंजी येथील सर्वसामान्य गरीब जनता आशीर्वाद देईल यात शंकाच नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More