ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड तर्फे हॉलमार्किंग जागरुकता चर्चासत्र संपन्न BIS हॉलमार्किंग जागरूकता चर्चासत्र संपन्न
इचलकरंजी:
भारतीय मानक ब्युरो (BIS) पुणे शाखा कार्यालय व इचलकरंजी परिसर सराफ व सुवर्णकार असोसिएशन यांच्या विशेष प्रयत्नातून.. इचलकरंजी शहर व परिसरातील सराफ सुवर्णकार यांचेकरीता HUID हॉलमार्कीग जागरूकता चर्चासत्र उत्साहात संपन्न झाले. सदर कार्यक्रमासाठी भारतीय मानक ब्युरो, पूर्ण शाखा कार्यालय येथिल हॉलमार्किंग अधिकारी श्रीमती शीन गंगराड व भी. प्रविणकुमार गर्ग हे उपस्थित होत. कार्यक्रमाची सुरुवात व स्वागत संचालक श्री. विजय मडके यांनी केले. श्रीमती शीनु गंगराडे यांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनात पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारे… BIS भारतीय मानक ब्युरो हि संस्था भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय अंतर्गत कार्य करते. या संस्थद्वारे सन २००० मध्ये हॉलमार्कची संकल्पना अस्तित्वात आली गेली. पण ऐच्छिक नोंदणी असल्याने ठराविक ज्वेलर्स नी याची नोंदणी करून घेतली. विक्री प्रक्रियेमध्ये शेवटचे टोक म्हणजे ग्राहक. तर अशा या ग्राहकांना मौल्यवान धातू सोने चांदी प्लॅटिनम अशा धातूंमधी दागिन्यांमध्ये उच्च गुणक्ता, शुद्धता, सौदर्यपूर्ण व विश्वासार्हता असलेले दागिने मिळावेत या उद्देशाने BIS ने, सन २०२१ भारताच्या विविध जिल्हांमध्ये हॉलमार्क नोंदणी व विक्री अनिवार्य बंधनकारक केले. तसेच १४,१८,२०,२२,२३ व २४ कॅरेटच्या दागिन्यांना विक्रीसाठी परवानगी दिली.
हॉलमार्क दागिन्यांमधील BIS व सराफ दुकानदार यांचेतील महत्त्वाचा दुवा म्हणजे हॉलमार्किंग सेंटर होय. सराफ दुकानदार अशा सेंटर मध्ये आपले दागिने जमा करतात. तेथील उच्च गुणक्तच्या प्रयोगशाळेमध्ये विविध चाचण्या त्या दागिन्यांवर केल्या जातात. योग्य कॅरेट व शुद्धता असेल तरच असे दागिने हॉलमार्क पासिंग केले जातात. त्यानंतर अशा दागिन्यांवर BIS लोगी, शुद्धतेचे कॅरेटचे वर्णन व ६ अंकी अल्फान्युमेरीकल कोड म्हणजेच हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर HUID चिन्हांकीत केला जातो.
असे शासनमान्य शुध्दतेचे दागिने विक्री करताना प्रत्येक नोंदणीकृत हॉलमार्क ज्वेलरी विक्रेते सराफ दुकानदार यांनी आपल्या दुकानात.. हॉलमार्फ नोंदणी चे प्रमाणपत्र. BIS लोगो किंवा स्टीकर, 10x दुर्बिणा ग्लास भिंग ठेवणे आवश्यक व सक्तीचे केले आहे. तसेच फक्त HUID केलेले दागिनेच विक्री करावेत असे सक्त आदेश दिलेले आहेत. प्रत्येक दागिन्यांचे बिलींग करताना, बिलावर कॅरेट प्रमाणे शुद्धतत कॅरेट प्रमाणे सोने दर, हॉलमार्कीग चा खर्च नमुद करणे सक्तिच केले आहे. तसेच २ ग्रॅम वरील सर्व दागिने हे HUID केलेच पाहिजे असेही सांगितले.
अशा या हॉलमार्किंग कायदयाचे पालन सर्व ज्वेलर्स करावे असे आवाहन यावेळेस करण्यात आले. तसेच या कायद्याची अंमलबजावणी योग्य रितीने होते की नाही याच्या पडताळणी साठी. BIS ने हॉलमार्क अधिकारी यांची नेमणुक केली आहे. हे अधिकारी प्रत्येक ज्वेलर्स मध्ये भेट देऊन BIS हॉलमार्क च्या नियमांचे पालन होत की नाही याची पडताळणी करतात. BIS ने त्यांना विशेष अधिकार दिलेले आहेत. हॉलमार्क सेंटर व ज्वेलर्स यांनी नियमानुसार केलेले HUID दागिने ते क्रॉस कनेक्शन साठी घेऊन जाऊ शकतात. योग्य कॅरेट शुध्दता आली नसल्यास हॉलमार्क सेंटर व ज्वेलर्स वर दंडात्मक कारवाई होऊ शक BIS ने BIS CARE अँप सुरु केले आहे. ते कोणतेही प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करू शकतात. सदर अॅपवर Verify HUID ऑप्शन दिसते. तेथे जाऊन तुमच्या दागिन्यां वरील HUID नंबर टाकल्यास. सदर दागिन्यांची शुद्धता, वजन, ज्वेलर्स चे नाव, हॉलमार्क सेंटर चे नाव पत्ता.. आदि सर्व माहिती पहावयास मिळते. तसेच काही तक्रार असेल तर याच अँपवर तक्रार देखील अपलोड करता येते. एकंदरीतच ग्राहकाभिमुख चांगल्या गुणवत्तापूर्ण सेवा देणे हेच BIS ला अपेक्षित आहे. त्यामूळे सर्व ज्वेल्वर्सना BISच्या नियमांचे पालन करून आपला व्यवसाय करणे क्रमप्राप्त आहे याची जागरुकता त्यांनी सर्वांना करून दिली.
यावेळेस हॉलमार्क HUID संदर्भान, सभासदांनी आपले अनेक प्रश्न विचारले. यामध्ये मिक्स लॉट चे HUID कसे करावे ? ४ ग्रॅम च्या आतील दागिनेवर HUID करावा का.? अल्टरेशन लागू होत की नवीन HUID करायचा? लाखी दागिनेवर HUID सोने दागिने सॅम्पल चेकसाठी नेल्यानंतर किती दिवसांनी परत मिळणार? बिलिंग ची पद्धती कशी असावीः ? स्क्रॅप डॅमेज दागिन्यावरील HUID चे काय करायचे? अशा विविध प्रश्नांवर शीनु गंगराडे मॅडम यांनी चर्चात्मक संभाषण करत समाधान – कारक उत्तरे दिली.अन्नपूर्णा गोल पुणे चे संचालक श्री. राजाराम पाटील यांनी आपल्या सहज सोप्या भाषेत होलमार्क दागिने विक्री व नोंदणी किती फायद्याचे आहे, पारंपारिक व्यवसाय करत असतानाच व्यवसायातील नवीन बदलास यशस्वीपणे सामोरे गेलेच पाहीजे याचे महत्व विषद केले.
अध्यक्ष श्री. सचिन देवरुखकर यांनी सर्व पाहुण्यांची ओळख करून दिली. सर्व मान्यवर श्रीमती शीनु गंगराडे, प्रविणकुमार गर्ग, राजाराम पाटील. कृष्णात बोरचाटे CA यांचा सत्कार समारंभ झाला. शेवटी आभार प्रदर्शन व भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास २०० च्या वर सभासदांनी उत्स्फुर्त हजेरी लावली.
यावेळी इचलकरंजी परिसर सराफ सुवर्णकार असोसिएशनचे राजू कदम, जतिन पोतदार, सचिन कापसे, उदय लोले, सुहास आवळकर, विकास यादव, नितिन पोतदार, महेश साळवी, इम्तियाज शेख, सचिन पोतदार, संतोष भाटले, सुनिल चौगुले आदी कार्यकारीणी सदस्य, तसेच इचलकरंजी सराफ व्यापारी असोसिएशनने संतोष शहा, सचिन दैवज्ञ, अतुल शहा, ओंकार पोतदार, अनिल रेवणकर, राजीव रेवणकर, कुडेकर आदी सदस्य उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800