इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडेच ठेवा-शहर कॉंग्रेसचे सतेज पाटलांना साकडे.
इचलकरंजी
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे ठेवण्यात यावा व एकनिष्ठ काँग्रेस कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात यावी.याबाबतचे निवेदन इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने गटनेते तथा जिल्हाध्यक्ष आ.सतेज उर्फ बंटी पाटील यांना देण्यात आले.
जिल्हाध्यक्ष आ.सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाने इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी कार्यकर्त्यांचे संघटन करून पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री.शशांक बावचकर,संजय कांबळे व राहुल खंजिरे यांनी इचलकरंजी नगरपालिकेमध्ये कॉंग्रेसचे नगरसेवक म्हणून तसेच आता महापालिका झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना सभागृहात व सभागृहाबाहेर मांडण्याचे व वाचा फोडण्याचे काम केले आहे.इचलकरंजीतील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, महत्वकांक्षी ड्रेनेज योजना, रस्ते व विकासकामे, आयजीएम मधील आंदोलने तसेच महानगरपालिकेच्या आरोग्यविभागाकडून शहराची स्वच्छता व अनुषंगिक कामे व प्रश्नाबाबत सर्व कार्यकर्त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.महाविकास आघाडी सरकारमध्ये राहुल खंजिरे यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून गोरगरीब कष्टकरी जनतेला न्याय मिळावा यासाठी नवनवीन योजना राबविल्या आहेत. संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या कार्यकालात ज्येष्ठ नागरिक, निराधार, विधवा, अपंग स्त्री व पुरूष अशा १०१०४ नवीन लाभार्थ्यांना पोस्टामार्फत अनुदान घरपोच देण्याचा उपक्रम पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच राबविला. यामुळे कॉंग्रेस पक्षाची प्रतिमा जनमानसात उंचावली आहे.
इचलकरंजी शहराचा प्रमुख उद्योग असलेल्या वस्त्रोद्योगामधील निर्माण झालेल्या वीज दर सवलतीचा संदर्भातील प्रश्न सोडविणेकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे,महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी मा. एच.के.पाटीलजी,महसूलमंत्री मा. बाळासाहेब थोरातजी,पालकमंत्री मा.सतेज पाटीलजी यांच्या मार्गदर्शनाने राज्यातील सर्व यंत्रमागधारक संघटना एकत्रित करून ऑनलाईन नोंदणीची अट रद्द करून, वीजदर सवलत पूर्ववत देण्याचा चा निर्णय इचलकरंजी येथील मेळाव्यात वस्त्रोद्योग मंत्री मा.अस्लमजी शेख यांच्या माध्यमातून घोषित करावयास लावला. हजारो कारखानदारांना याचा लाभ झाला.यामुळे आघाडी सरकार व काँग्रेस पक्ष आपल्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला ही भावना मी उद्योजकांमध्ये निर्माण झाली. सरकारच्या निर्णयाचे कौतुक झाले.
इचलकरंजीतील ज्वलंत प्रश्न म्हणजे पाणी व वस्त्रोद्योग प्रश्न. इचलकरंजी शहर कॉंग्रेस पदाधिकारी, महिला कॉंग्रेस,युवक कॉंग्रेस,NSUI व इतर सर्व सेलच्या माध्यमातून जनतेमध्ये सुळकुड योजना पाणी प्रश्नाविषयी सभा घेऊन जनजागृती केली आहे. वस्त्रोद्योगातील अनेक प्रश्न घेऊन जिल्हाध्यक्ष मा.श्री. सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाने माजी वस्त्रोद्योग मंत्री अस्लमजी शेख यांचे सोबत इचलकरंजी शहरामध्ये व्यापक बैठक बोलवून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला होता. विविध आंदोलनाच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्षाचे विचार जनतेसमोर नेण्याचा ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी शहर कॉंग्रेसचे संघटन बळकट झाले आहे. राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रा व जातीय जनगणनेच्या भूमिकेमुळे बहुसंख्य तरुण कॉंग्रेसकडे आकर्षित होत आहे. जुना पारंपारिक मतदार पुन्हा कॉंग्रेस कडे वळत आहे.
परवा झालेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उबाठा) चे उमेदवार श्री सत्यजित पाटील सरुडकर यांची सर्व प्रचार यंत्रणा इचलकरंजी शहर काँग्रेस कार्यालयातून राबविण्यात आली. इचलकरंजी शहरामध्ये सरुडकर यांना मताधिक्य मिळाले नसले तरी व तशा अर्थाने नवखा उमेदवार असला तरी इचलकरंजी शहरात प्रचारामध्ये आघाडी घेऊन ७१,००० मते मिळवण्याचे काम कॉंग्रेसच्या पुढाकाराने झाले आहे.
वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून इचलकरंजी विधानसभा मतदार संघ हा काँग्रेस पक्षाकडे राहील अशा पद्धतीचे प्रयत्न आपणाकडून होणे आवश्यक आहे. तरी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनेच लढविण्यात यावा ही नम्र विनंती यावेळी राहुल खंजिरे,शशांक बावचकर ,संजय कांबळे,शशिकांत देसाई,बाबासो कोतवाल,सौ.मीना बेडगे,प्रमोद खुडे,विनायक शिंगाडे, रविराज पाटील,सौ.बिस्मिल्ला गैबान यांनी केली.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800