इचलकरंजीतील सर्व भागातील कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त न केल्यास पालिकेत कुत्री सोडण्याचा नागरिकांचा इशारा.
इचलकरंजी
इचलकरंजी शहरातील कुत्र्यांचा ८ दिवसात बंदोबस्त न केल्यास कुत्री महापालिकेत आयुक्तांच्या कार्यालयात सोडण्याचा इशारा प्रभाग क्रमांक १९ मधील नागरिकांनी महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांना दिला.आंदोलनाचे नेतृत्व अमित बियाणी व गोविंद आढाव यांनी केले.
निवेदनात आम्ही सर्व वॉर्ड नंबर १९ मधील रहिवासी व इचलकरंजीतील नागरिक वर्षानुवर्षे येथे राहत आहोत.
काल १ सप्टेंबर २०२४ रोजी मुरदंडे मळा गल्ली नंबर दोन येथे एका दीड वर्षाच्या बालकावर आठ ते दहा कुत्र्यांनी हल्ला चढविला त्या हल्ल्यात त्या बालकाला गंभीर दुखापत झाली असून त्यावर उपचार सुरू आहेत. त्यानंतर संध्याकाळी मुरदुंडे मळा गल्ली नंबर १ येथे एका लहान मुलीस पुन्हा त्याच कुत्र्यांनी चावा घेतला.
त्यामुळे भागातील सर्व नागरिकांच्या म्हणण्यानुसार इचलकरंजी शहरातील सर्व भागात परिस्थिती आहे.
तरी आपणास नम्र विनंती आहे आमच्या भागातील सर्व भागातील गावठी आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा त्वरित योग्य तो बंदोबस्त करावा. जर पालिकेकडून ८ दिवसात यावर कार्यवाही झाली नाही तर आम्ही भागातील नागरिक महानगरपालिकेत इचलकरंजीतील कुत्री आणून सोडू आणि आपणास शहरवासियांच्या त्रासाची जाणीव करून देऊ.
यानंतर होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार असाल आरोग्य विभागास इचलकरंजीतील सर्व नागरिक, विविध सामाजिक संस्था यांनी वारंवार निवेदन देऊन व कळवूनही आपण कुत्र्यांचा बंदोबस्त झालेला नाही त्यामुळे आम्हीही ८ दिवसाची मुदत आपणास निवेदनाद्वारे देत आहोत अन्यथा आम्हाला कुत्री महापालिकेत सोडण्याशिवाय पर्याय राहणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी असा इशारा दिला.याावेळी अमित बियाणी, गोविंद आढाव,पिंटू मोरे,नितेश पोवार,राजु बोंद्रे,इम्रान मकानदार,शितल मगदुम यांच्यासहित कार्यकर्ते उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800