वीजदर सवलत निर्णय-पॉवरलूम असोसिएशनने मानले आ.प्रकाश आवाडें व राज्य शासनाचे आभार
इचलकरंजी
यंत्रमागाच्या वीज दर सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणीची अट शिथील करणेचा निर्णय दि. १३ ऑगस्ट २०२४ रोजीच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये घेणेत आला होता. त्याचा शासन निर्णय दि. २ सप्टेंबर २०२४ रोजी निर्गमीत झाला आहे.
दि. १५ मार्च २०२४ रोजी २७ एच.पी. खालील यंत्रमाग उद्योगास प्रती युनिट रू. १ व २७ एच.पी. वरील यंत्रमाग उद्योगास प्रती युनिट ७५ पैशांची अतिरिक्त वीज दर सवलत देण्याचा निर्णय झाला होता. परंतू त्यामध्ये ही सवलत मिळविणेसाठी ऑनलाईन नोंदणीची अट घालणेत आली होती. या ऑनलाईन नोंदणीच्या अटीस महाराष्ट्रातील सर्व वस्त्रोद्योग केंद्रातील यंत्रमागधारक संघटना व लोक प्रतिनिधींचा तसेच यंत्रमागधारकांचा जोरदार विरोध झाला होता. या जोरदार विरोधानंतर दि. १३ ऑगस्ट २०२४ रोजी ऑनलाईन रजिष्ट्रेशनची अट शिथील करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर झाला. याचा शासन निर्णय दि. २ सप्टेंबर २०२४ रोजी निर्गमीत झाला आहे. या निर्णयामुळे आता दि. १५ मार्च २०२४ पासून १ रूपये व ७५ पैशांची अतिरिक्त सवलत यंत्रमागधारकांना मिळणेचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाबाबत राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा.ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.ना. अजित पवार व वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.चंद्रकांत पाटील तसेच यंत्रमागधारकांना ही वीज सवलत मिळवून देणेसाठी सतत प्रयत्नशील असणारे व साध्या मागास अतिरिक्त १ रूपयांची सवलत मिळालीच पाहिजे यासाठी धडपडणारे आमदार मा.प्रकाश आवाडे यांचे मन:पूर्वक आभार दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मानले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800