सरस्वती रामकिशोर धूत ट्रस्ट, कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा यांच्यातर्फे पोलिसांसाठी `तंदुरूस्त बंदोबस्त` उपक्रम
इचलकरंजी, ता. १६ ः विसर्जन बंदोबस्तावेळी पोलिसांना मिळेल तो आहार घ्यावा लागतो. अशा परिस्थीतीत पौष्टीक आहार मिळाल्यामुळे कामात अधिक उर्जा मिळते. त्यामुळे `तंदुरूस्त बंदोबस्त` उपक्रम हा स्तूत्य आहे, असे प्रतिपादन पोलीस उप अधिक्षक समीरसिंह साळवे यांनी केले.
येथील सौ. सरस्वती रामकिशोर धूत चॅरिटेबल ट्रस्ट, कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा यांच्या सहकार्याने यंदाही `तंदुरूस्त बंदोबस्त` उपक्रम घेण्यात आला. यावेळी उप अधिक्षक साळवे बोलत होते. यावेळी गणेश विसर्जन बंदोबस्तासाठी तैनात केलेल्या ७५० पोलिसांना चिक्की, राजगीरा लाडू या पौष्टीक आहारासह मीनरल पाण्याची बाॅटलचे वाटप करण्यात आले.
उप अधिक्षक साळवे म्हणाले, पोलीस अंमलदार हा पोलिसांचा कणा असून बंदोबस्तावेळी महत्वाची भूमिका बजावतात. गणेशोत्सवात दरवर्षी पोलीस दलाची जबाबदारी वाढतच आहे. कामाची वेळ आणि आहार यांचे नियोजन होत नाही. अशा परिस्थीतीत लोकशाहीतील स्तंभ पोलीसांसाठी सहकार्याची भूमिका घेतात, ही चांगल्या उपक्रमाची नांदी आहे.
प्रास्ताविक करतांना कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी समाजाचे जिल्हाध्यक्ष नितीन धूत म्हणाले, दरवर्षी विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्याचे काम पोलीस दल करीत असते. या काळात होणा-या बंदोबस्तावेळी पोलिसांसाठी आरोग्यदायी उपक्रम घेण्याचे योगदान मिळल्याचा मोठा आनंद आहे. यापुढील काळातही माहेश्वरी समाजाचे प्रत्येक सामाजिक कार्यात सहकार्याची भूमिका राहणार आहे.
महापालिकेच्या राजीव गांधी भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात डाॅ. एस. पी. मर्दा यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांचा राजस्थानी पगडी व बुके देवून सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस निरिक्षक सचिन पाटील, प्रविण खानापूरे, सचिन सुर्यवंशी, एन. आर. चौखंडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत निशाणदार, माहेश्वरी समाजाचे लालचंद गट्टाणी, नंदकिशोर भूतडा, धनराज डालीया, रामुशेठ मुंदडा, हर्षल धूत, आनंद बांगड, रामगोपाल मालाणी, रामराज भांगडिया, मनोज सारडा, मनोज राठी, श्यामसुंदर झंवर, हरीष सारडा, सुरेंद्र हेडा, सुनील मुंदडा, संजय सोमाणी, कृष्णकांत भूतडा आदी उपस्थीत होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800