कै. वसंतराव देशमुख (दादा) यांच्या जाण्याने कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघ पोरका —-एस. डी. लाड
इचलकरंजी — कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष कैलासवासी वसंतराव देशमुख( दादा) यांच्या आकस्मित झालेल्या निधनामुळे कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघ पोरका झाला असून एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याचे दुःख होत आहे.प्रमाणिकपणा शिक्षणाबाबत त्यांची असलेली आत्मीयता नेहमीच प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष श्री एस. डी.लाडसर यांनी काढले. ते इचलकरंजी शैक्षणिक व्यासपीठ व इचलकरंजी शहर शिक्षण संस्था संघ यांच्या वतीने दि न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या ठिकाणी कै. वसंतराव देशमुख दादा यांच्या निधनाबद्दल आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेत बोलत होते.श्रद्धांजली सभेच्या अध्यक्षस्थानी इचलकरंजी शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष श्री डी.एम. कस्तुरे हे होते श्रद्धांजली सभेत माननीय श्री.मदनराव कारंडे श्री.पुंडलिकराव जाधव, प्राध्यापक शेखर शहा, श्री नंदकुमार इनामदार, श्री इरफान अन्सारी, श्री अशोक हुबळे,श्री बी.ए. कोळी,श्री वि.ह.सपाटे,श्री आर एस देवाळकर आदींनी कैलासवासी वसंतराव देशमुख दादा यांनी केलेल्या शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्याचा आढावा आपल्या मनोगतात घेऊन कै. देशमुख दादांचे कार्य पुढे जोमाने वाढवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असल्याचे सांगितले. यावेळी मा. सुधाकरराव मणेरे (मामा), श्री. रमेश मर्दा, श्री. अमरसिंह माने,श्री. अरुण खंजीरे, श्री शेखर पाटील,श्री. सुनील कुरणे, सौ. आर. एन.जाधव, श्री शिवाजी पाटील, श्री अशोक निंबाळकर, श्री पी. डी. शिंदे,श्री आर एच कांबळे, श्री हुंबल, श्री. डी. ए. तराळ,श्री संजय चौगुले,सौ एस. पी.पाटील, सौ. डी. व्ही. मगदूम, श्री अशोक खोत, श्री. अशोक शिंदे,सौ, व्ही.सी. फाटक, श्री रमेश चौगुले आदी सह विविध शैक्षणिक संस्थेचे -संघटनाचे पदाधिकारी, इचलकरंजी शहर परिसरातील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800