डीकेटीईमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन
इचलकरंजी:
येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल अँड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मधील तरुण युवा वर्गास वाव मिळावा या उद्देशाने विद्यार्थी व विद्यार्थींना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना सहजपणे रोजगार प्राप्त करून देण्याच्या हेतुने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना ऑनलाईन पध्दतीने देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी महाविद्यलयाच्या कौशल्य विकास केंद्र उदद्याटन कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण करण्यात आले.
आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची संकल्पना कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोंढा यांनी मांडली. राज्यातील कानाकोपा-यातील महाविद्यालयीन तरुणांमध्ये कौशल्य विकास व्हावे यासाठीच १००० महाविद्यालयामध्ये ही केंद्रे सुरु केली आहेत. यामुळे शहरातील व गावातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. या अंतर्गतच दरवर्षी प्रत्येक महाविद्यालयातील केंद्रामध्ये १५० विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. अशा पध्दतीने प्रत्येक महाविद्यालयामध्ये प्रशिक्षणानुसार वर्षभरात तब्बल दीड लाख तरुणांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
आचार्य कौशलय विकास केंद्रामध्ये २०० ते ६०० तासांचे म्हणजेच साधारणत: ३ महिन्याचे नॅशनल स्किलस क्वॉलीफिकेशन फे्रमवर्क सुसंगत असलेले अल्प मदतीचे अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. स्थानिक उदयोगांची गरज लक्षात घेवून उद्योग आस्थापनांना लागणारे प्रशिक्षित मुनष्यबळ उपलब्ध होवून रोजगार व स्वंयरोजगाराच्या संधी युवक-युवतींना उपलब्ध होणार आहेत.या केंद्रामुळे रोजगार निर्मिती वाढणार आहे.त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे आणि कौशल्य विकसित करावे ज्यामुळे स्थानिक पातळीवरच नव्हे तर मोठया पातळीवरही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे अवाहन संस्थेच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे व ट्रस्टी रवी आवाडे यांनी यावेळी केले.या कार्यक्रमास संस्थेच्या संचालिका डॉ एल.एस.अडमुठे, डीन ऍडमिन डॉ एस.के. शिरगांवे, विभागप्रमुख डॉ व्ही.आर.नाईक, डॉ. डी.व्ही.कोदवडे, टी.आय.बागवान उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.गिरीष मेकळके, प्रा. सुयोग रायजाधव व प्रा. विनोद कुंभार यांनी काम पाहिले.


Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800