स्वच्छता ही सेवा’ २०२४ या अभियाना अंतर्गत महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
इचलकरंजी
शासन निर्देशानुसार संपूर्ण देशात ‘स्वच्छता ही सेवा’ २०२४ अभियान मोठ्या प्रमाणात राबविणेत येत आहे.
या अभियानाच्या अनुषंगाने दि.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा करणेत येत आहे. या पंधरवड्यात विविध उपक्रम राबविणेत येत आहेत.
आज मंगळवार दि.२४ सप्टेंबर रोजी श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे महिलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणेत आलेले होते.
कार्यक्रमाचा शुभारंभ उपायुक्त स्मृती पाटील यांच्या हस्ते आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, सहा.आयुक्त रोशनी गोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिपप्रज्वलन करून करणेत आले.
आजच्या स्पर्धेमध्ये
ग्रुप डान्स करिता प्रथम क्रमांक राजश्री छत्रपती शाहू हायस्कूल, द्वितीय क्रमांक अष्टभुजा ग्रुप , विशेष गौरव पुरस्कार इचलकरंजी महानगरपालिकेच्या राजश्री कोरगावकर, ज्योती साठे, संजना चव्हाण, राजश्री काटकर, पार्वती माने, सुवर्णा कानडे या महिलांचा ग्रुपला देणेत आला.
तसेच वैयक्तिक डान्स स्पर्धेत प्रथम क्रमांक अर्निका चौगुले, द्वितीय क्रमांक अनुष्का भंडारी तृतीय क्रमांक प्रेरणा अरोरा यांनी पटकावला. विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवुन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सहा.कर संकलन मुल्य निर्धारण अधिकारी अरिफा नुलकर, कार्यालय अधीक्षक प्रियांका बनसोडे, महिला बाल कल्याण अधिकारी सिमा धुमाळ, ग्रंथपाल बेबी नदाफ, खरेदी पर्यवेक्षक शितल पाटील, विधी अधिकारी खदिजा सनदी, सुजाता दाभोळे यांचेसह विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांच्या महिला तसेच विविध शाळेतील विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800