रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी तर्फे गणेशोत्सव देखावा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.
इचलकरंजी
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी च्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक गणेश मंडळ व घरगुती गणेश भक्त यांना प्रोत्साहन पारितोषिके देण्यात आली. यामध्ये उत्कृष्ट मूर्ती ,सामाजिक, समाज प्रबोधन ,उत्कृष्ट देखावा ,सजीव देखावा, कलात्मक देखावा, पौराणिक देखावा, ऐतिहासिक देखावा ,असे देखाव्या सादर करणाऱ्या मंडळांना व घरगुती गणेश भक्तांना प्रोत्सानात्मक पारितोषिके वितरित करण्यात आली. सदरचा पारितोषिक वितरण समारंभ रोटरी क्लब इचलकरंजी दाते मळा येथे संपन्न झाला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे रोटरी प्रांत 31 70 चे उपप्रांतपाल यतीराज भंडारी हे होतें. तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष पाटील सेक्रेटरी चंद्रकांत मगदूम प्रोजेक्ट चेअरमन सागर पाटील प्रोजेक्ट को- चेअरमन प्रकाश रावळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी स्वागत पर मनोगत व्यक्त केले. पाहुणे यतीराज भंडारी यांचेही यावेळी शुभेच्छा पर मनोगत झाले .आभार सागर पाटील यांनी मानले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यनारायण . धूत व संजय घायतिडक यांनी केले. यावेळी डॉ. लक्ष्मीकांत तोष्णीवाल यांनी मिरवणुकी वेळी डॉल्बीचा आवाज नागरिकांना होऊ नये याकरिता कॉटन कापसाचे बोळे वाटप केल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सार्वजनिक गणेशोत्सव अवॉर्ड पुढील प्रमाणे -प्रथम -अण्णाकावतील ग्रुप, द्वितीय- साई गणेशोत्सव मंडळ, तृतीय- सावकार राजा गणेशोत्सव मंडळ, उत्तेजनार्थ- नारायण नगर गोंधळी समाज, उत्तेजनार्थ -नदीवेस परिसर बागडी समाज गणेशोत्सव मंडळ ,समाज प्रबोधन देखावा -प्रथम न्यू गणेश तरुण मंडळ, द्वितीय- महालक्ष्मी सेवाभावी संस्था, तृतीय- व्यंकटेश्वरा गणेशोत्सव मंडळ, कलात्मक देखावा -प्रथम कलानगर गणेशोत्सव मंडळ, द्वितीय- शिवशक्ती गल्ली गणेशोत्सव मंडळ, तृतीय- मोरया ग्रुप ,उत्तेजनार्थ -छत्रपती गणेशोत्सव मंडळ ,समाज प्रबोधन पर हालता देखावा- प्रथम- वखार भाग गणेशोत्सव मंडळ, द्वितीय -राजे युवक मंडळ ,पौराणिक देखावा- प्रथम रिंग रोडचा गजवक्र गणेश मंडळ ,द्वितीय- मोरया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तृतीय -राष्ट्र ज्योत युवक मंडळ ,उत्कृष्ट हलता देखावा -प्रथम -श्री लक्ष्मी को- कोऑप प्रोसेसर्स , द्वितीय -विश्वशांती मित्र मंडळ तृतीय -बिरदेव वाचनालय गणेशोत्सव मंडळ ,समाज प्रबोधन पर सजीव देखावा- हत्ती चौक गणेशोत्सव मंडळ विशेष पुरस्कार प्रेरणा चौक गणेशोत्सव मंडळ,
घरगुती गणेशोत्सव भक्त यामध्ये उत्कृष्ट आलता देखावा- प्रथम -श्री सुभाष परीट, द्वितीय- श्री दत्तराज इंदुलकर, तृतीय- श्री अनिकेत मोरे, उत्तेजनार्थ- श्री भालचंद्र टाकवडे, -उत्कृष्ट समाज प्रबोधन देखावा -प्रथम श्री किरण काकडे ,द्वितीय -श्री अर्चित जोशी, तृतीय श्री शितल मोरे, उत्तेजनार्थ+ श्री शशिकांत भोसले, उत्तेजनार्थ- श्री योगेंद्र व्हनुगरे, उत्कृष्ट सजावट- प्रथम -अमित जसवानी, द्वितीय -श्री अनिल हरणे ,तृतीय -श्री रणवीर कवटगे ,ऐतिहासिक देखावा- श्री निलेश सातपुते, द्वितीय -श्री योगेश नाईक ,तृतीय -श्री सचिन कांबळे, पौराणिक देखावा -प्रथम -श्री शिवाजी कुराडे, द्वितीय -सौ प्रियंका रोकडे ,तृतीय -श्री अरविंद चौगुले- उत्तेजनार्थ- श्री योगेश मुदगल ,तसेच विशेष पुरस्कार दिव्यांग गणेश भक्त श्री संदीप जाधव, रोटरी परिवार मध्ये प्रथम -श्री सौरभ खारगे ,द्वितीय -सौ मेघा घायतिडक यांना देण्यात आले. कार्यक्रमा वेळी शिवदास कित्तुरे, राजारामशास्त्री जाधव ,सुजित मगदूम, नेमिनाथ कोथळे ,वसंत पाटील तसेच मंडळाचे कार्यकर्ते ,घरगुती गणेश भक्त कुटुंबीय मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी तर्फे गणेशोत्सव मंडळांना पारितोषिक वितरण करताना उपप्रांतपाल यतीराज भंडारी, क्लबचे अध्यक्ष संतोष पाटील, सेक्रेटरी चंद्रकांत मगदूम, प्रोजेक्ट चेअरमन सागर पाटील ,प्रोजेक्ट को चेअरमन प्रकाश रावळ
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800