मावा विक्रीप्रकरणी चौघांवर कारवाई.
इचलकरंजी
इचलकरंजी येथील सुंदर बाग परिसरातील प्लेअर्स पान शॉप मध्ये छापा टाकून येथे मावा विक्री करिता आलेल्या निखील दत्तात्रय रसाळ वय २४ जवाहरनगर यास ताब्यात घेतले.
निखिल रसाळ याचे जवाहरनगर गणपती मंदिराजवळ समर्थ पान शॉप नावाची पानटपरी असून तेथे मावा तयार करून इतरत्र विक्री करण्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.दुकानात तयार केलेल्या सुगंधी तंबाखू,सुपारीचे मिश्रण असलेले प्लास्टिकच्या कागदामध्ये गुंडाळलेल्या ४८ पुड्या जप्त करण्यात आल्या आहेत त्याचा पानटपरी व्यवसाय आहे याबाबत इचलकरंजी पोलीस ठाणे येथे याबात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
त्याचबरोबर अझीम युनूस मुल्ला वय २७,रा विक्रमनगर यास बालाजी चौक ते थोरात चौक रस्त्यावर पानविला पान शॉपमध्ये विक्री करित असताना ६७ पुड्या हस्तगत केल्या.
त्याचबरोबर तौसिफ शब्बीर हुक्कीरे वय ३४,रा जामा मस्जिद जवळ,टाकवडे वेस यास महासत्ता चौक ते राजवाडा चौक रस्त्यावर तौफिक पान शॉपमध्ये विक्री करत असताना ३६ पुड्या हस्तगत केल्या.
त्याचबरोबर ताहीर हुसेन बादशहा मुजावर वय २६,रा विक्रमनगर यास बालाजी चौक ते थोरात चौक रस्त्यावर बरकतहु पान शॉपमध्ये विक्री करित असताना ५१ पुड्या हस्तगत केल्या.
वरील सर्व गुन्ह्यात इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद झाले असून पुढील तपास संजय दिनकर कुंभार ,महेश अशोक पाटील प्रदीप सखारामा पाटील,पो.हे.कॉ. पाटील सर्व नेमणुक स्था. गु.अ. शाखा कोल्हापूर हे करत आहेत.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800