९-१०-२०२४ रोजीची करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी प्रत्यंगिरा रूपातील पुजा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

९-१०-२०२४ रोजीची करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी प्रत्यंगिरा रूपातील पुजा

कोल्हापूर

आज शारदीय नवरात्र महोत्सवाचा सातवा दिवस षष्ठी तिथी आजच्या तिथीला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी प्रत्यंगिरा रूपात सजली आहे. प्रत्यंगिरा आदिशक्तीचे एक विनाशक रूप मानले जाते. हिरण्यकश्यपू वधानंतर क्रोधाविष्ट झालेल्या नरसिंहाला शांत करण्यासाठी भगवान शंकरांनी शरभ अवतार धारण केला यावेळी त्यांच्याबरोबर मदतीला देवी प्रत्यंगिरेचा अवतार झाला हातामध्ये चंद्रहास खड्ग, त्रिशूल डमरू आणि पानपात्र ही चार आयुधे धारण करून सिन्हा वरती विराजमान झालेली आहे. सिंह मुखी व सिंहवाहिनी अशीही भगवती प्रत्यंगिरा भक्ताच्या भयाचा नाश करते काही पुराणकथा प्रमाणे अंगिरस ऋषींकडे कोणी एक मुमुक्षु ज्ञानप्राप्तीसाठी गेला तेव्हा ऋषींची समाधी भंग करून त्याने ऋषींना जागे केले त्याचा हा अपराध मानून तू पाषाण हो असा शाप अंगिरस ऋषी त्याला दिला परंतु त्याची ज्ञानलालसा लक्षात घेऊन तू शक्तिदेवता होशील असा उ:शाप दिला त्याला अनुसरून प्रत्यंगिरे चा अवतार झाला असेही मानले जाते. कोल्हापुरात नवदुर्गांपैकी एक तसेच पुण्यात जवळ कुरकुंभ येथे प्रत्यंगिरे ची उपासना फिरंगाई या नावाने केली जाते. या देवीला भय तसेच नकारात्मकता दूर करणारी देवी असे म्हटले जाते काही ठिकाणी प्रत्यंगिरादेवीला अथर्वर्ण भद्रकाली असेही म्हटले आहे अशी ही भयापहारीणी प्रत्यंगिरा आपणा सर्वांचे रक्षण करो
श्रीमातृचरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तिक

व्हिडीओ साठी क्लिक करा

https://youtu.be/-uoAVB2Y2jk?si=5ck-DOHpCxI3uIot

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More