वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करा,शहर वाहतूक सल्लागार समितीची बैठक बोलवण्याची इनामची मागणी.
इचलकरंजी
शहरातील वाहतुकीचे योग्य नियोजन करून वाहतूक समस्या मार्गी लावण्याबाबतचे निवेदन
शहर वाहतूक शाखा इचलकरंजीचे प्रभारी प्रशांत निशाणदार यांना इनामच्या वतीने देण्यात आले.
यामध्ये दिपावली बाजार मुख्य रस्त्यावर भरल्यामुळे राज्य महामार्ग बंद होतो व स्थानिक व्यापाऱ्यांचे नुकसान होत असून त्यांच्याकडे ग्राहक जाण्यास रस्ता राहत नाही तसेच त्यांना स्वतःचा माल सुद्धा दुकानात आणता येत नाही,याबाबत महानगरपालिकेच्या मोकळ्या मैदानात दिपावली बाजार भरवण्यात यावा व स्थानिक व्यापाऱ्यांचे नुकसान टाळावे यासाठी आपण उपाययोजना कराव्यात.राज्य महामार्ग बंद होऊ न देणे आपली जबाबदारी आहे.इचलकरंजी शहरात क्रेनच्या माध्यमातून वाहतूक शाखेची अरेरावी सुरू असून गोरगरीब जनतेला लुटण्याचे काम सुरू आहे.ज्या ठिकाणी पांढरे पट्टे मारलेले नाहीत,स्पष्ट फलक लावलेले नाहीत त्या ठिकाणी क्रेनची कारवाई करू नये.इचलकरंजी शहरातील सिसीटीव्हीचा वाहतूक नियंत्रणात मोठा वाटा असतो व त्याचा चांगला उपयोग पोलीस खात्यास होतो.सीसीटीव्ही सुरू करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत.सायंकाळी ५ ते ६ या वेळेत शाळा सुटल्यामुळे महासत्ता चौकात व सांगली नाका परिसरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते.यावेळी वाहतूक पोलीस तेथे कार्यरत ठेवून वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात यावा.शहर वाहतूक सल्लागार समितीची बैठक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी झाली होती,११ महिने झाले तरी बैठकीस मुहूर्त का सापडेना त्वरित शहर वाहतूक सल्लागार समितीची बैठक बोलवण्यात यावी व तातडीने वाहतुकी संदर्भात उपाययोजना करण्यात याव्यात अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.यावर कोणत्याही पद्धतीने मुख्य मार्ग बंद केला जाणार नाही,वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईबाबत जर तक्रार असली तर कधीही संपर्क साधावा अन्याय होणार नाही,सीसीटीव्ही बाबत अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून पाठपुरावा सुरू आहे.सांगली नाका परिसरात सिग्नल मंजूर झालेला आहे त्यामुळे तेथील प्रश्न लवकरच मार्गी लागेल वाहतूक समितीची बैठक आठवड्या भरात घेण्यात येईल असे स्पष्ट करताना महापालिकेशी पाठपुरावा सुरू असून आयुक्तांची भेट घेणार असल्याचेही सांगितले.
यावेळी इनामचे राजु कोन्नुर,उदयसिंह निंबाळकर, अमितकुमार बियाणी,महेंद्र जाधव, प्रशांत साळुंखे,हरीश देवाडिगा,दीपक पंडित,राम आडकी,माणिक जांगीड,अमोल ढवळे, अभिजित पटवा उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800