भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा,स्वच्छतेबाबत उपाययोजना करा-इनाम.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा,स्वच्छतेबाबत उपाययोजना करा-इनाम.

इचलकरंजी
विविध नागरी समस्यांची सोडवणूक करणेबाबत इनामने आज उपायुक्त सोमनाथ आढाव,स्मृती पाटील,प्रसाद काटकर यांना निवेदन दिले.
इचलकरंजी शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या परत दिवसेंदिवस वाढत असून महापालिकेने केलेल्या उपाययोजना कुचकामी ठरत आहे,याबाबत आता सध्या काय स्थिती आहे व आपण काय उपाययोजना करत आहात ते कळवावे.तातडीने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.इचलकरंजी शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून वरवरचे काम सुरू आहे,आरोग्य विभागावर कुणाचे नियंत्रण आहे का नाही असा प्रश्न पडला आहे,अयोध्या कॉलनीतील ऑक्सिजन पार्क मध्ये सारण गटारीचे पाणी आत जात असून पार्कचा उद्देश शुद्ध हवा की गटारीचे पाणी हे समजण्यास मार्ग नाही.दिपावली बाजार मुख्य रस्त्यावर भरल्यामुळे राज्य महामार्ग बंद होतो व स्थानिक व्यापाऱ्यांचे नुकसान होत असून त्यांच्याकडे ग्राहक जाण्यास रस्ता राहत नाही तसेच त्यांना स्वतःचा माल सुद्धा दुकानात आणता येत नाही,याबाबत महानगरपालिकेच्या मोकळ्या मैदानात दिपावली बाजार भरवण्यात यावा व स्थानिक व्यापाऱ्यांचे नुकसान टाळावे.
दिपावली सणावेळी तात्पुरते फटाका विक्री परवाने महसूल विभाग,महानगरपालिका, पोलीस यांच्या नियंत्रणात दिले जातात.त्यांना सुविधा पुरवणे महानगरपालिकेचे काम असते त्या पुरवल्या गेल्याने शहरात बेकायदेशीर फटाका विक्री होते.महापालिकेने तातडीने याबाबत उपाययोजना करून ठरवलेल्या ठिकाणीच फटाका विक्री होईल याची काळजी घ्यावी.
याबाबत बोलताना कुत्र्यांचा निर्बीजीकरणासाठी २ पथके लावली असून कारवाई सुरू आहे.स्वच्छता बाबत नविन टेंडर प्रक्रिया सुरू असून ८ दिवसात यामध्ये सकारात्मक बदल घडेल,दिपावली बाजार व फटाके विक्री करिता ठिकाणे निश्चित करण्याचा प्रस्ताव पाठवला असून लवकरच त्याबाबत धोरण जाहीर केले जाईल.अशी आश्वासने देण्यात आली.
यावेळी इनामचे राजु कोन्नुर,उदयसिंह निंबाळकर, अमितकुमार बियाणी,महेंद्र जाधव, प्रशांत साळुंखे,हरीश देवाडिगा,दीपक पंडित,राम आडकी,माणिक जांगीड,अमोल ढवळे, अभिजित पटवा उपस्थित होते.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More