डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी बनविले दिपावलीसाठी ‘प्लॅस्टीक बॉटल व प्लॅस्टीकच्या चहाच्या कपापासून आकाशकंदील व इतर साहित्य’, नैसर्गिक स्त्रोताचा वापर करुन दिवाळी साजरी करण्याचे विद्यार्थ्यांचे अवाहन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी बनविले दिपावलीसाठी ‘प्लॅस्टीक बॉटल व प्लॅस्टीकच्या चहाच्या कपापासून आकाशकंदील व इतर साहित्य’, नैसर्गिक स्त्रोताचा वापर करुन दिवाळी साजरी करण्याचे विद्यार्थ्यांचे अवाहन.
इचलकरंजी:
वर्षातील सर्वात मोठा सण म्हणून दिवाळी हा सण सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो, तेजाचा उत्सव असलेल्या दिवाळी सणाला सगळीकडे विद्युत रोषणाई, दिव्यांची आरस,मातीचे दिवे, रंगबेरंगी रंगीत रांगोळी, दाराचे तोरण असते. प्रत्येकाचे घर उजळते ते विद्युत रोषणाईने व रंगबेरंगी आकाशकंदीलमुळे. तसेच दिवाळीनिमित्त प्रत्येकाला घरामध्ये नविन रोषणाईचे वेध असतेच. या दिवाळीचे आकर्षण म्हणून डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी वेस्ट टू बेस्ट या संकल्पनेतून रिकाम्या प्लॅस्टीक बॉटलचा व चहाच्या कपाचा वापर करुन पर्यावरणपूरक आकाशकंदील बनविले आहेत तर नारळाच्या बेल्टयापासून शोभेचे आकाशकंदील बनविले आहेत याशिवाय पारंपरिक व नैसर्गिक स्त्रोताचा वापर करीत सौरउर्जेवरील शोभेच्या वस्तू बनविल्या आहेत तर रिकाम्या सुती पोत्यापासून आकर्षक असे स्व. रतन टाटा यांची छायाचित्र असलेले आकाशकंदील बनविले आहेत.
डीकेटीईमधील एआयसीटीई आयडिया लॅब मध्ये प्रथम व द्वितीय विभागाच्या विद्यार्थ्यांनी ‘सोलारवाली दिवाळी’ या उपक्रमांतर्गत सौरउर्जेवरील अनेक साहित्य बनविले आहे. यामध्ये प्रमुख आकर्षण म्हणजे पाण्यावरील रांगोळी होती रिकाम्या ताटामध्ये विद्यार्थ्यांनी पाण्यावर तरंगणारी रांगोळी काढलेली होती. या रांगोळीकडे सर्वांचे मन अकर्षित होत होते. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या साहित्यांमध्ये इकोफे्रंडली साहित्यांचा वापर केलेला आहे ही रांगोळी, आकाशकंदील अंगणात जरी लावले तरी वारा, पाउस यापासून संरक्षण होते व ते उजळत रहावे हया हेतुने बनविले आहेत तसेच या आकाशकंदीलमध्ये व शोभेच्या पणत्यामध्ये वीज, तेल, वात वैगरे काहीही लागत नाही फक्त सौरउर्जेवर चालत असल्याने विजेची व घरगुती साहीत्यांची व वेळेची बचत होणार आहे.
हे आकाशकंदील बाजारात विक्रीस असलेल्या अकाशकंदीलासारखे आकर्षक असून यामध्ये स्व. रतन टाटा, डीकेटीईचे लोगो यांची छायाचित्रे साकारली असून हे सर्व साहित्य पूर्णपणे पारंपरिक असून स्वदेशी बनावटीच्या साहित्यापासून बनविलेले आहे सर्व सामन्यांना परवडेल अशा कमी किमतीत व दिसायला सुबक बनविलेले आहेत यामुळे दिवाळी सणाचा आनंद द्विगणीत होणार आहे. मागील वर्षीच्या दिवाळीसाठी देखील विद्यार्थ्यांनी सौरउर्जेवरील आकाशकंदील, रांगोळी, दाराचे तोरण व मातीचे दिवे केले होते ते आजही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी बनविलेले सौरउर्जेवरील साहित्य हे मोठमोठया कंपन्यामध्ये, मॉलमध्ये, लग्नसमारंभाच्या हॉलमध्ये जिथे वर्षभर कार्यक्रम किंवा उत्सव असतात अशा ठिकाणी वापरु शकतात यामुळे त्या कार्यक्रमाची शोभा वाढेल या सर्व वस्तू सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरेल असा विद्यार्थ्यांचा विश्‍वास आहे.
श्रेया मेंदुगळे, अनघा सुतार, अर्मान नायकवडी, सानिया मुजावर, मधुरा पाटील, श्रेया रानडे, आदित्य हातरोटे, सिध्दांत लाटकर, संपदा देशपांडे, अनुष्का हाके, अथर्व गुंडप, साईराज पाटील, झोया शेख, सुहाससिंग रजपुत व विद्यार्थ्यांच्या टिमनी सहभाग घेतला एआयसीटीई आयाडिया लॅब अंतर्गत असलेल्या आयडिया ऍण्ड क्रिएशन क्लब चे अर्थ शहा, राखी पाटील व संपूर्ण क्लबचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे,आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडेे, रवी आवाडे व सर्व विश्‍वस्त यांनी विद्यार्थ्यांस शुभेच्छा दिल्या. सौरउर्जेवरील सर्व साहीत्य तयार करण्यासाठी डायरेक्टर प्रा. डॉ सौ. एल.एस.आडमुठे, उपसंचालक प्रा डॉ यु.जे. पाटील,आयडिया लॅबचे प्रा.डॉ. व्ही.डी. शिंदे, प्रा.सुयोग रायजाधव, प्रा.विनोद कुंभार, प्रा.जी.सी.मेकळके,प्रा.दिग्वीजय म्हामणे व प्राध्यपकांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो- डीकेटीईमध्ये दिवाळीनिमित्त तयार केलेल्या अकाशकंदील व साहित्यांसोबत विद्यार्थी व मागदर्शक प्राध्यापक
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More