तरुणांनी राहुल आवाडे यांच्या पाठीशी रहावे : नरेंद्र पाटील.
इचलकरंजी – आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध करून देताना महामंडळाच्या माध्यमातून १ लाख उद्योजक तयार केले. रिकाम्या हातांना सर्वसामान्य मराठा बांधवांना अनेक बँकांनी या योजनेच्या माध्यमातून स्थैर्य दिले. या पाठीमागे भारतीय जनता पार्टीचे योगदान मोलाचे आहे. भविष्यातही इचलकरंजी विधानसभा मतदार संघात युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी महायुतीचे उमेदवार डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथील भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालयात आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. पाटील बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, शहराध्यक्ष पै. अमृत भोसले उपस्थित होते. नरेंद्र पाटील यांनी, उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी आवश्यकतेनुसार कर्ज उपलब्ध करुन देऊन सामान्य माणसाला आर्थिक स्थैर्य देण्याचे काम करणार आहे. महायुती सरकारच्याने या महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक बळ दिले असून ते अखंडीतपणे सुरु राहण्यासाठी तरुणांनी राहुल आवाडे यांच्या पाठीशी रहावे, असे आवाहन केले. यावेळी मनोज साळुंखे, संतोष शेळके, मोहन मालवणकर, मनोज हिंगमिरे, जयेश बुगड, रमेश कबाडे, सुभाष जाधव, मोहन काळे, सतीश मुळीक, राजू देसाई, बंडोपंत लाड, नितीन पडियार, मोहन मालवणकर, राजेश रजपूत, नागेश पाटील यांच्यासह भाजप महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








