ICHMH51NEWS.IN
9921600800

सांगली रोड परिसरात मदन कारंडेच्या पदयात्रेस उस्फुर्त प्रतिसाद

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सांगली रोड परिसरात मदन कारंडेच्या पदयात्रेस उस्फुर्त प्रतिसाद
इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील  महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांनी महासत्ता चौक येथील हनुमान मंदिरात नारळ वाढून प्रचाराला सुरुवात केली. प्रचारादरम्यान, अनेकांनी बुके, हार व शाल देऊन त्यांना पाठिंबा दिला. महाविकास आघाडीमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
             प्रचारादरम्यान नागरिकांचा मोठा उत्साह दिसून आला. महासत्ता चौकातून सुरू झालेली प्रचार यात्रा साळुंखे मळा,गोंदकर मळा,स्वामी मळा, आमराई मळा, आदिनाथ सोसायटी, रायगड कॉलनी, तीनशे खोल्या, साईट नंबर 102, निशिगंध कॉलनी, शिक्षक सोसायटी, गुलमोहर कॉलनी, सुरभी कॉलनी, वृंदावन कॉलनी, सहकारनगर येथे प्रचार फेरीचा समारोप करण्यात आला.
             दरम्यान , पदयात्रेतून मतदारांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि इचलकरंजीच्या विकासासाठी आपली बांधिलकी व्यक्त केली. या प्रचार केलेला मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सयाजी चव्हाण , काँग्रेसचे राहुल खंजिरे, शशांक बावचकर, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा