डी केए एस सी महाविद्यालयातील डॉ. अजिंक्य पत्रावळे यांना कॅन्सर बाबत संशोधनाबद्दल UK सरकारचे पेटंट प्राप्त.
इचलकरंजी :
येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉक्टर अजिंक्य पत्रावळे यांना कॅन्सर या रोगास संदर्भातील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी UK सरकारचे डिझाईन विभागातील पेटंट प्राप्त झाले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आणि संशोधनाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर यांनी त्यांचे अभिनंदन केले. डॉ. अजिंक्य पत्रावळे यांनी यापूर्वीही कॅन्सर संदर्भातील एका महत्त्वाच्या संशोधनासाठी पेटंट मिळवले आहे. या पेटंट मध्ये त्यांनी मिसोपोरर् कार्बन, टंगस्टन ओक्साईड नॅनोकॉम्पोझिट याचा ड्रग कॅरियर म्हणून वापर करता येतो याबाबत महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. “कॅन्सर आजारावरील निदानासंदर्भात सध्या जगभर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू असताना याबाबत महाविद्यालयातील प्राध्यापकांनी संशोधन करून पेटंट प्राप्त करणे महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे.” असे मनोगत यावेळी प्राचार्य डॉ. मणेर यांनी व्यक्त केले.या पेटंटसाठी डॉ. पत्रावळे यांना शिवाजी विद्यापीठमधील डॉ. स्नेहा भोसले, प्रा. डॉ. प्रशांत अनभुले, डॉ. शिंपले, डॉ. विठोबा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी महाविद्यालयातील गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800