प्रबोधन वाचनालयात संविधान प्रास्ताविकाचे सामुदायिक वाचन
भारतीय संविधान मंजुरीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयात संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. प्रसाद कुलकर्णी यांनी यावेळी प्रास्तविकेचे क्रमशः वाचन केले.प्रमुख पाहूणे माजी नगरसेवक अब्राहम आवळे यांनी यावेळी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीतील योगदान आणि संविधानाच्या तत्वज्ञानाचे महत्व अधोरेखीत केले.तर वाचनालयाचे अध्यक्ष शशांक बावचकर यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेतील तात्विक आशय, महात्मा गांधी, पंडीत नेहरू,डॉ. आंबेडकर ,भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील मूल्ये आणि सर्वोच्च न्यायालयाने समाजवाद व धर्मनिरपेक्षता याबाबत दिलेला निर्णय आदींचा उहापोह केला.यावेळी ग्रंथालयात संविधान विषयक ग्रंथांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते . या कार्यक्रमास राहूल खंजिरे, दत्ता माने,पांडूरंग पिसे, सदा मलाबादे,महेंद्र जाधव, नंदकिशोर जोशी, अनिल होगाडे मनोहर जोशी,सौदामिनी कुलकर्णी, नंदा हालभावी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800