इचलकरंजी महानगरपालिका रविंद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळेचा २१ व्या क्रीडा महोत्सवाचा प्र.आयुक्त तथा प्रशासक सुषमा शिंदे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी समिरसिंह साळवे यांच्या हस्ते शुभारंभ.
इचलकरंजी महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागाकडील रविंद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळेचा २१ वा क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ महानगरपालिका प्र.आयुक्त तथा प्रशासक सुषमा शिंदे यांच्या हस्ते आणि उपविभागीय पोलिस अधिकारी समिरसिंह साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या अनुषंगाने शहरातील शिवतीर्थ येथे प्र. आयुक्त तथा प्रशासक सुषमा शिंदे आणि उपविभागीय अधिकारी समिरसिंह साळवे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून मिरवणूकीद्वारे रविंद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळेमध्ये आले नंतर सदर क्रीडा ज्योतीचे पुजन करून रविंद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळेचा क्रीडा ध्वज फडकवणेत आला.
या क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल आणि रविंद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळेमध्ये कार्यरत असलेले महानगरपालिका कर्मचारी संजय महाजन हे महानगरपालिका सेवेतून सेवानिवृत्त झाले बद्दल मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन त्यांचा गौरव करणेत आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून प्राथमिक शिक्षण विभागाचे पर्यवेक्षक राजेंद्र घोडके यांनी रविंद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळेची सविस्तर माहिती सादर केली.
यानिमित्ताने आपले मनोगत व्यक्त करताना प्र. आयुक्त तथा प्रशासक सुषमा शिंदे यांनी सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देवून महानगरपालिकेच्या वतीने रविंद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळेसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देणेची ग्वाही दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी समिरसिंह साळवे यांनी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांना आपल्या भावी जीवनात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या त्याच बरोबर शिक्षक आणि शिक्षिका यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी प्रशासन अधिकारी इरफान पटेल, शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर पोवार, क्रीडा अधिकारी संजय शेटे, मुख्याध्यापिका अलका शेलार, सहा क्रीडा अधिकारी संजय कांबळे, क्रीडा पर्यवेक्षक सचिन खोंद्रे, संदीप जोशी,अजित शेट्टी, किरण दिवटे यांचेसह रविंद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळेमधील शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800