बांग्लादेशातील हिंदुंवरील अत्याचाराच्या विरोधात १० डिसेंबर ला “मानवाधिकार हुंकार मोर्चा”
इचलकरंजी
बांग्लादेशातील हिंदुंवरील अत्याचाराच्या विरोधात १० डिसेंबर ला “मानवाधिकार हुंकार मोर्चा” आयोजित केल्याची माहिती बाळ महाराज व सनत दायमा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मोर्चा दुपारी ४ वाजता शिवतीर्थ ते मलाबादे चौकातून प्रांत कार्यालयात जाईल आणि तेथे निवेदन देण्यात येणार आहे.
संपूर्ण जग आज आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय करार यांनी एकमेकांशी जोडले गेले आहे. बांगलादेशमध्ये हिंदुंवर ठरवून होत असलेले अत्याचार आज संपूर्ण जग बघते आहे आणि त्याचा ठिकठिकाणी निषेध देखील होत आहे. भारतीय संविधानाने देखील भारतीय नागरिकांना शांततापूर्ण मार्गान निषेध आणि रोष व्यक्त करण्याचा अधिकार/हक्क दिला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याशी सुसंगत असणारी भूमिका घेणे आणि राष्ट्रहितार्थ भूमिका घेणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. भारताने राष्ट्र म्हणून मानवी हक्कांच्या सार्वभौमिक घोषणापत्रावर १९४५ साली स्वाक्षरी केली आहे. भारताने एक राष्ट्र म्हणून कायम मानवाधिकारांचा पुरस्कार केला आहे. आज भारतातील सुज्ञ नागरिक म्हणून आपल्या राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय भूमिकांचा सन्मान करणे हे आमचे आम्ही कर्तव्य समजतो.
बांग्लादेश मध्ये होत असलेले हिंदुंवरील अत्याचार हे मानवाधिकारांचे उल्लंघन करणारे आहेत. हिंदुंवर होत असलेल्या अमानुष अत्याचारांचा आणि त्यांना देण्यात येणाऱ्या अमानवीय वागणुकीचा निषेध करणे हा आमचा संवैधानिक हक्क आणि आमचे राष्ट्रीय कर्त्यव्य आहे. सदरील “मानवाधिकार हुंकार मोर्चाचा” हेतू हा भारतीय समाजात मानवाधिकारांविषयी जागरूकता निर्माण करणे आहे. बांग्लादेश मध्ये हिंदूंवर झालेल्या व चालू असलेल्या अमानुष अत्याचाराने मानवाधिकारांचे झालेले उल्लंघन नागरिकांच्या निदर्शनास येणे गरजेचे आहे. सामान्य नागरिकांमध्ये मानवाधिकार संरक्षणाच्या गरजेची जाणीव निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न आहे. या हिंदू न्याय यात्रे द्वारे प्रातिनिधिक स्वरुपात प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन देण्यात येईल ज्याद्वारे संपूर्ण समाज आपल्या भावना सरकार पर्यंत पोहचवेल.
ज्या नागरिकांना या आंदोलनात सहभागी होता येणार नाही त्यांनी दंडावर काळी फित बांधून बांग्लादेश सरकार विरोधात निषेध व्यक्त करावा. याच बरोबर मंगळवार दिनांक १० डिसेंबर रोजी इचलकरंजी परिसर व संलग्न छोट्या मोठ्या गावा गावात सकल हिंदूतर्फे गावातील मंदीरात महा आरती घेऊन बांग्लादेशातील हिंदू बांधवांनसाठी प्रार्थना करण्यात येईल. असे आवाहन सकल हिंदू इचलकरंजी यांच्या मार्फत करण्यात आले आहे.यावेळी प्रसाद जाधव,सर्जेराव घोरपडे, योगेश जेरे, पंढरीनाथ ठाणेकर,प्रवीण सामंत,मंगेश मस्कर,संचित पुरी उपस्थित
होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800