कबनुर वीर सेवा दल शाखेच्या संघनायकपदी अरिहंत हेरवाडे तर उपसंघनायक पदी प्रशांत केटकाळे
इचलकरंजी
कबनूर येथील वीर सेवा दलाच्या नुतन पदाधिकारी निवडी नुकत्याच पार पडल्या.सुरुवात णमोकार महामंत्राने झाली.मान्यवरांचे स्वागत तालुका सदस्य विशाल जनाज यांनी केले .वीर सेवा दल संघनायकपदी अरिहंत हेरवाडे उपसंघनायकपदी प्रशांत केटकाळे, संचालक-विवेक उदय जनाज,सांस्कृतिक संचालक-संदीप चंद्रकांत सगरे,सामाजिक संचालक-सुरज पिरंगोंडा लिगाडे,संघटक संचालक-प्रज्योत सुभाष पाटील, जिल्हा मध्यवर्ती सदस्य-हेमंत देसाई,ग्रंथालय विभाग प्रमुख-प्रज्ज्वल राजेंद्र मगदूम,शिबीर विभाग प्रमुख-श्रेयश अजित खिचडे,पाठशाळा विभाग प्रमुख- दिपक आण्णाप्पा कोले,वृक्षारोपण विभाग प्रमुख-सुशांत बाबासाहेब मल्लिवाडे,क्रीडा व आरोग्य विभाग प्रमुख-प्रथमेश राजू शिरगुप्पे
वाद्यपथक विभाग प्रमुख-दर्शन महावरे शिरगुप्पे
स्वयंसेवक विभाग प्रमुख-सम्मेद रावसाहेब भेंडवडे या पदाधिकारी यांची निवड मोठ्या उत्साहात करण्यात आली.
यावेळी नुतन संघनायक, उपसंघनायक व शाखा पदाधिकारी यांच्या निवडी वीर सेवा दलाचे मध्यवर्थी सदस्य बाहुबली उपाध्ये,प्रांतीय सदस्य शितल पाटील ,सौरभ पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या.
नूतन संघनायक व उपसंघनायक यांचा सत्कार समाजाचे अध्यक्ष संजय लिगाडे (दादा ) याच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी वीर सेवादलाचे वीर सैनिक उपस्थित होते . शेवटी आभार संघनायक अरिहंत हेरवाडे यानी मानले.प्रतिज्ञा व णमोकार महामंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800