शुटींग बॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या तांत्रिक समितीवर निवडीबद्दल यशवंत प्रोसेर्ससतर्फे लक्ष्मण साठे यांचा सत्कार
इचलकरंजी:
शुटींग बॉलचे ज्येष्ठ खेळाडू लक्ष्मण साठे यांची शुटींग बॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या तांत्रिक समितीवर नुकतीच निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल दि यशवंत को.ऑप. प्रोसेर्ससचे चेअरमन अहमद मुजावर यांच्या हस्ते लक्ष्मण साठे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.
लक्ष्मण साठे हे यशवंत प्रोसेसर्स या संस्थेतील शुटींग बॉलचे ज्येष्ठ खेळाडू आहेत. त्यांची शुटींग बॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या तांत्रिक समितीवर निवड झाली आहे. या निवडीचे पत्र फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी जनरल जितराज तोमर यांनी दिले आहे. साठे यांना खेळाच्या प्रगतीत माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे व कै. बाळासाहेब लायकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. निवडीसाठी खेळाडू संघटना व अॅडव्होक कमिटीचे अध्यक्ष संग्रामभाऊ देशमुख, उपाध्यक्ष नाना काळे, राजेंद्र नांद्रेकर, पांडूरंग कदम व संघटना सदस्यांनी प्रयत्न केले. संस्थेचे ज्येष्ठ खेळाडू साठे यांच्या या निवडीबद्दल यशवंत प्रोसेर्स येथे चेअरमन अहमद मुजावर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे संचालक श्रेणिक मगदूम, चंद्रकांत घाटगे, आनंदा दोपारे, रणजित गायकवाड, रमेश कबाडे, सुहास कांबळे, योगेश पाटील, राजेश भिसे, मॅनेजर शफिक मणेर तसेच रामचंद्र परदेशी, विजय लायकर व दिलावर शेख उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800