महाराष्ट्र कोष्टी समाजातर्फे जनसंर्पक अभियान
इचलकरंजी:
महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ, मुंबईच्या वतीने अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांच्यासह महासचिव रामचंद्र निमणकर, सचिव दिलीप भंडारे, मनोज खेतमर, मिलिंद कांबळे आदींनी 2 ऑक्टोंबर गांधीजयंती पासून राज्यव्यापी दौरा फलटण गावापासून सुरू केला आहे. जवळपास विविध जिल्ह्यातील 90 गावातील 75 श्री चौंडेश्वरी मंदिरांना भेटी दिल्या आहेत. दौर्याचा उद्देश श्री चौंडेश्वरी मंदिर भेटी तसेच कोष्टी समाज बांधवांशी जनसंपर्क अभियान हा आहे.
या अभियानात समाज बांधवांशी हितगुज साधणे, त्यांच्या चांगल्या बाबींचे कौतुक करून त्यांच्या अडचणी समजून घेणे व विचारांची देवाण- घेवाण करून संघटना बांधणी हा असून संपूर्ण राज्यभर या दौर्यास अतिशय भरघोस व चांगला प्रतिसाद मिळत आहे. समाज बांधवाना श्री चौंडेश्वरी मंदिरात व मंदिर नसेल तेथे समाज बांधवांच्या घरी मिटींग घेवून सर्वाना एकत्रित करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. खंडित झालेला हा उपक्रम पुन्हा सूरु केला असून गेल्या आठवड्यात सांगली तासगाव, विटा, दहिवडी, फलटण, बारामती, दौंड, काष्टी, अहिल्यानगर याठिकाणी मंदिर भेटी तसेच समाजप्रमुखांच्या घरी भेटी दिल्या व समाज बाधंवाच्या बांधणी करणेचा पुन्हा आरंभ केला आहे.
यावेळी सर्वश्री शंकर वैद्य, धोंडीराम टेके, विष्णू लोटके, सौ. स्वाती दौंडे, सौ. लता बोंगार्डे, बाबुराव म्हेत्रे, अविनाश चोथे, तारळेकर, रामचंद्र तारळेकर, शशिकांत म्हेत्रे, महादेव कुरकुटे, देवेंद्र म्हेत्रे, दगडू दाते, महालिंग लोटके, अॅड. भास्करराव गुंडगे, संजयराव वाडकर, कुमठेकर, अजू भागवत (दौंडे), सौ. सुनंदा डोईफोडे (कोष्टी), सुहास ढवळे, प्रफुल्ल लाटणे, रुपेश मुकोटे, अशोक फातले, संजय भंडारी, संतोष टेके, सागर दळवे, सुभाष पासले, विजय खटावकर, सौ. पूजा दळवे, सौ. जयश्री लाटणे, सौ. सुप्रिया पाखले, सौ. रुपाली मुकोटे या व अनेक समाज बांधवांशी हितगुज केले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800