शुक्रवारपासून इचलकरंजीत राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा
इचलकरंजी:
येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे ‘राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे हे सव्विसावे वर्ष असून शुक्रवार दिनांक २७ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता या स्पर्धेचे उदघाटन होणार आहे. सदरच्या स्पर्धेस उत्तम प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्र, गोवा, बेळगाव विभागातील ३६ संघांना प्रवेश देण्यात आला आहे. या स्पर्धेचे परीक्षक या नात्याने प्रसिद्ध रंगकर्मी ज्ञानेश मोघे गोवा, मंगेश दिवाणजी पुणे आणि यशोधन गडकरी सांगली हे जाणकार उपस्थित राहणार आहेत.
दिनांक २७ डिसेंबर रोजी दुपारी १ पासून येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात स्पर्धेस सुरुवात होईल. या दिवशी न लुकलुकणारे डोळे – द ट्री ऑफ शॅडो इचलकरंजी, मून विदाऊट स्काय – मुक्ताई फौंडेशन पुणे, चाहूल – कलाकार मंडळी पुणे, स्मशान – अल्कश निर्मिती सांगली, अंतरंग – कलास्पंदन क्रिएशन कराड, अलमोस्ट यु डाईड – रंग प्रसंग कोल्हापूर, प्रश्न (अ क्वेश्चन) – शारदा रंजन सांस्कृतिक मंच कोल्हापूर, फक्त तो एक क्षण – श्री राधे नाटक ग्रुप कोल्हापूर आणि माई – डी के ए एस सी कॉलेज इचलकरंजी या एकांकिका होणार आहेत.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी २८ तारखेला असाही एक कलावंत – रुद्र प्रॉडक्शन इचलकरंजी, साकव – धूळपाटी क्रिएशन इस्लामपूर, स्पर्श – नभांत नाट्य संस्था तासगाव, गांधीला बॉडी पाहिजे देता का? – गडहिंग्लज नगरपरिषद व गडहिंग्लज कला अकादमी, बांध – तंत्रज्ञान अधिविभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, फिनिक्स – नाट्य शुभांगी जयसिंगपूर, ओल्ड मंक – तुमचं आमचं मुंबई आणि चरचरणाऱ्या फॅन्टसीचे युद्ध – रंगयात्रा नाट्यसंस्था इचलकरंजी या एकांकिका सादर होतील.
तिसऱ्या दिवशी रविवारी २९ डिसेंबर रोजी सर्प सत्र – इम्पिरिकल फाउंडेशन कल्याण, ठसका – पी एम पी एल नाट्य सेवा संघ पुणे, लॉटरी – फोर्थ वॉल थिएटर इचलकरंजी, बॉईल्ड शुद्ध शाकाहारी – कलादर्शन व नाट्य शृंगार पुणे, माऊली – गायन समाज देवल क्लब कोल्हापूर, पसायदान – कल्लाकार्स ठाणे, पूर्णविराम – कलासक्त मुंबई, लेबल – निर्मिती नाट्यसंस्था सातारा, आणि मंडेला इफेक्ट – क्रिएटिव्ह कार्टी मुंबई या एकांकिकांचे सादरीकरण होईल.
स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी सोमवारी ३० तारखेला यात्रा – दे. भ. रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर, कलम ३७५ – परिवर्तन कला फाउंडेशन कोल्हापूर, व्हाय नॉट – राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालय बुधगाव, डोन्ट क्वीट – नाट्यमय पुणे, चिनाब से रावी तक – क्राउड नाट्य संस्था डोंबिवली, शोशित (शोधला शिवाजी तर) – नाट्य आरंभ पुणे व मेगो एंटरटेनमेंट, चारू – अंबरेश्वर थिएटर्स अंबरनाथ, खोली नंबर २०२४ – जीएसएस विज्ञान महाविद्यालय बेळगाव आणि हायब्रीड – आरपीडी कला व वाणिज्य महाविद्यालय बेळगाव या एकांकिका सादर होणार आहेत. स्पर्धेचा बक्षीस समारंभ याचवेळी सर्व सादरीकरण संपल्यानंतर होणार आहे.
सदरच्या मनोरंजन करंडक एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने विविध ठिकाणच्या नाट्य कलाकारांचा उत्स्फूर्त कलाविष्कार पाहण्याची संधी इचलकरंजी शहर आणि परिसरातील रसिकांना लाभणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून रसिकांनी या सर्व नाट्याविष्काराचा आनंद घेण्यासाठी जरूर यावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800