वस्त्रोद्योगाच्या प्रलंबित प्रश्नाबाबत पॉवरलूम असोसिएशनचे आ.राहुल आवाडेना निवेदन.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वस्त्रोद्योगाच्या प्रलंबित प्रश्नाबाबत पॉवरलूम असोसिएशनचे आ.राहुल आवाडेना निवेदन.

इचलकरंजी:

यंत्रमाग उद्योगातील प्रलंबित प्रश्नांबाबत दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या शिष्टमंडळाने आमदार मा.राहुल आवाडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून निवेदन दिले. यावेळी आमदार मा.राहुल आवाडे यांनी यासंदर्भात लवकरच मुंबई येथे संबंधीत मंत्री, संबंधीत विभागाचे सचिव व अधिकारी यांचेसोबत मिटींग लवणेत येईल असे आश्वान दिले.

सदर निवेदनामध्ये २७ एच.पी. वरील यंत्रमागधारकांची २ महिन्यांची पोकळ थकबाकीची रक्कम वगळणेत आली आहे. परंतू त्यावरील व्याज व दंडाची रक्कम वजा करणेत आली नाही. तर कांही कारखानदारांकडून जबरदस्तीने भरून घेतलेली अहे. ती परत मिळावी.

पुर्वी महावितरण कंपनीकडून यंत्रमागधारकांना एका शेडमध्ये २७ एच.पी. खाली व २७ एच.पी. वर अशा दोन्ही प्रकारामध्ये २ कनेक्शनपासून ६ – ८ कनेक्शनपर्यंत मल्टीपार्टी वीज कनेक्शन मागेल त्या यंत्रमागधारकांना मिळत होते. परंतू क्युबिकलची अट घालणेत आली आहे. ती खूप खर्चीक व यंत्रमागधारकांना न परवडणारी आहे. त्यामुळे ती अट काढणेत यावी. व पुर्वीप्रमाणे मल्टीपार्टी वीज कनेक्शन मागेल त्या यंत्रमागधारकांना मिळावे.

साध्या यंत्रमागधारकांनी व्यवसायाकरीता घेतलेल्या कर्जावर ५% व शटललेस यंत्रमागधारकांनी व्यवसायाकरीता घेतलेल्या कर्जावर २% व्याज सवलत सोप्या पद्धतीने मागणी अर्ज घेऊन मिळावी. आणि ती बँका व वित्तीय संस्थांच्या सर्व प्रकारच्या ( मुदत कर्ज व खेळते भांडवल ) जून्या व नव्या कर्जासाठी असावी. थकीत व एन.पी.ए. मध्ये गेलेल्या कर्जाचा समावेश या योजनेत करेणेत यावा.

यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळासाठी सूतावर प्रती किलो रू. १ सेस लावून जमा होणाऱ्या रक्कमेतून कामगारांना प्रोव्हिडंड फंड, ग्रॅच्युईटी, ई.एस.आय., रजा सुट्टी, वैद्यकिय रजा व त्यांचा सानुग्रह अनुदान (बोनस) दिला जावा.

ज्या कारखान्यांमध्ये मल्टीपार्टी वीज कनेक्शन आहेत. त्याठिकाणी सोलर प्रकल्प उभारणे अडचणीचे होत आहे. त्याशिवाय संपूर्ण औद्योगिक वसाहतीस एकत्रित सोलरचा वीज पुरवठा करणे किंवा नविन पॉलिसीमध्ये असलेल्या अडचणींसंदर्भामध्ये विचार विनिमय करणेत यावे. यासंदर्भात कार्यशाळा आयोजीत करून यातील त्रुटी व अडचणी दूर कराव्यात.

जिल्ह्यामध्ये कृषी, वस्त्रोद्योग व इंजिनिअरींग या उद्योगामध्ये निर्यातक्षम मालाचे उत्पादन होते. या उद्योजकांच्या सोयीसाठी जिल्ह्यामध्ये लॉजेस्टीक पार्क / पायाभुत सुविधा / ड्रायपोर्टची योजना राबविली जावी.

यंत्रमाग उद्योगामध्ये नविन उत्पादन घेताना वेगवेगळ्या प्रकारचे टेस्टिंग करणे आवश्यक असते. ते नसल्या कारणाने उद्योजकांना नविन उत्पादने घेता येत नसलेने त्यांचे नुकसान होत आहे. त्यासाठी आधुनिक टेस्टिंग लॅब इचलकरंजी येथे होणे आवश्यक आहे.

औद्योगिक कारखान्यात आग लागलेस ती विजवणेसाठी पाण्याचा वापर केलेने उद्योजकांचे जास्त नुकसान होते. सध्या अग्नीशमनामध्ये नविन अधुनिक यंत्रसामुग्री जसे की फायर बॉल, फोम पावरड स्प्रे इ. प्रकारची आलेली आहे. याचा वापर वस्त्रोद्योगामध्ये झालेस उद्योजकांचे नुकसान कमी होईल. यासाठी नविन आधुनिक अग्निशमन यंत्रसामुग्रीची महानगरपालिकेमार्फ त महाराष्ट्र शासनाच्या मदतीने उपलब्धता करून देणेत यावी. इ. मागण्या करूण या मागण्यांचा साकल्याने विचार करून लवकरच मिटींग आयोजित करणेत यावी असे नमुद केलेले आहे.

सदर शिष्टमंडळात अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष रफिक खानापूरे, संचालक पांडूरंग सोलगे, सुभाष बलवान, दत्तात्रय टेके, राजाराम गिरी, उद्योजक प्रमोद महाजन इ.चा समावेश होता. यावेळी कारखानदार उपस्थित होते.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More