भाजपा सदस्य नोंदणी अभियान अंतर्गत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात एकाच दिवशी तब्बल १५,७९० सभासद सदस्यांची नोंदणी.
इचलकरंजी ता.०५
‘विकसित भारत’ घडविण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी कटिबध्द आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रालाही देशातील नंबर एकचे राज्य बनवणारे मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष ना. चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित संघटन पर्व अंतर्गत सदस्यता नोंदणी अभियानाला इचलकरंजी विधानसभा मतदार संघामध्ये भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर तसेच आमदार डॉ. राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, शहराध्यक्ष पै. अमृतमामा भोसले, यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात सुरुवात झाले.
या अभियानाच्या अनुषंगाने आज लांडे हॉस्पिटल, बावडेकर चाळ, जुने ST स्टैंड, बालाजी चौक, बोंगार्डे पान शॉप, गणेशनगर, गणपती मंदिर जवाहर नगर, तारदाळ, खोतवाड, कोरोची,
या अभियाना वेळी जास्तीत जास्त नागरिकांनी 8800002024 या सदस्यता नोंदणी क्रमांकावर मिस्डकॉल देऊन, भारतीय जनता पार्टीचे सदस्य होऊन भारताला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी आपले मोलाचे योगदान द्यावे, सर्वांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारून देशसेवेच्या कार्यात स्वतःला झोकून द्यावे, हे विनम्र आवाहन त्यांना केली.
सदर या सदस्य नोंदणी अभियानास माजी नगरसेवक दिलीप मुथा यांचे सहकार्य लाभले. तसेच शशिकांत मोहिते यांनी अभियानाचे संयोजक म्हणून काम पाहिले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800