विकास विद्यामंदिर व चौगुले बालवाडी शाळेचा ३६ वे वार्षिक स्नेहसंमेलन व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
इचलकरंजी :
विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विकास विद्यामंदिर व चौगुले बालवाडी गणेशनगर व शाखा कोरोची यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन व सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी संस्थेचे संस्थापक कै. इराप्पा चौगुले, नृत्य देवता नटराज यांचे प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे माजी आमदार सुरेश हाळवणकर, कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे अधीक्षक उदय सरनाईक, जिल्हा परिषद कोल्हापूर ग्रामविकास अधिकारी सचिन शिरदवाडे, संस्थेचे अध्यक्ष विकास चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शाळेला विविध माध्यमातून योगदान दिलेबद्दल आप्पासाहेब कुडचे,माहेश्वरी संस्कृती ग्रुप व सुरज निर्मळे यांचा योगदान मूर्ती म्हणून तर श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अतुल आंबी यांचा विशेष सत्कार मूर्ती म्हणून सत्कार करण्यात आला.तसेच विविध प्रज्ञाशोध परीक्षांमध्ये राज्यस्तरीय यश प्राप्त केलेबद्दल शाळेतील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांच्या तालावर नृत्याविष्कार सादर केले.
कार्यक्रमास पारसजी वागोनी,बसवेश्वर हिरेमठ, रेणूजी झंवर,शांतिनाथ पाटील, धनंजय टारे,सचिन माळी, गोपाळ उरणे, अमित पाटील, स्मिता चौगुले, सुनिता कनवाडे, यश चौगुले ,विक्रम कनवाडे, दत्तात्रय देसाई, शिवानंद रावळ, अतुल आंबी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800