इचलकरंजी परिसरात आयजीएम थोरला दवाखाना: आरोग्यमंत्री आबिटकर.आवश्यक त्या सुविधा पुरवणार.
इचलकरंजी,
इचलकरंजी परिसरासह हातकणंगले शिरोळ तालुक्यातील रुग्णासाठी आयजीएम हा थोरला दवाखाना ठरत आहे असे मत सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आयजीएम मध्ये भेटीदरम्यान आढावा बैठकीत व्यक्त केले.
इचलकरंजी करांचे माझ्यावर प्रेम असून राधानगरी तालुक्यातील बहुसंख्य लोक इकडे उदरनिर्वाहासाठी आले आहेत.इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात ज्या काही उणीवा आहेत त्या तात्काळ सुधारल्या जातील असे मत व्यक्त केले.
आ.राहुल आवाडे यांनी प्रास्ताविकात नर्सिंग कॉलेज,गळती,अपुरा स्टाफ याबाबत लक्ष वेधले असता याबाबत आपणास मंत्री आले आणि गेले असे होणार नाही तर फरक जरूर दिसेल असेही मनोगतात सांगितले.
यावेळी आमदार राहुल आवाडे, सहायक संचालक आरोग्य विभाग डॉ सतीश सूर्यवंशी उपस्थित होते.
हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यांतील प्रमुख रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयाला महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान, त्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली आणि रुग्णांशी संवाद साधला. यावेळी रुग्णालयातील काही उणिवा लक्षात घेऊन, त्या त्वरित दूर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच ही भेट केवळ औपचारिक नसून, रुग्णालयाच्या विकासाच्या दृष्टीने पडलेले पाऊल असल्याचे स्पष्ट केले. यावेळी आरोग्य मंत्री आबिटकर यांनी आयजीएम रुग्णालयात मोती बिंदु शस्त्रक्रिया, शस्त्रक्रिया विभाग, डायलेसिस विभाग यासह डीजी हेल्थ या मोबाईल एप्लिकेशन चे उद्घाटन केले.
आमदार राहुल आवाडे यांनी बोलताना रुग्णालयातील कोविड काळात काम केलेल्यांना पगार मिळालेला नाही. रुग्णालयाच्या विविध मागण्यां पूर्ण होत नाहीत तो पर्यत आरोग्यमंत्र्याकडे पाठपुरावा करत राहीन असे म्हंटले. तसेच नर्सिंग कॉलेज, एसटीपी प्लॅँट, अपुरा स्टाफ व विविध सुविधांसंदर्भातील समस्या आयोग्यमंत्र्यासमोर मांडल्या. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक सुप्रिया देशमुख, वैद्यकीय अधीक्षक भाग्यरेखा पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित सोहनी,डॉ. संदीप मिरजकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे-कोले, रवींद्र माने, रवी रजपुते, कपिल शेटके आदी उपस्थित होते.
–
आयजीएम दिव्यांग प्रमाणपत्र सुविधा उपलब्ध करण्याची मागणी:
शहर परिसरातील दिव्यांगांना प्रमाणपत्रासाठी कोल्हापुरचे हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे दिव्यांगांना शाररिक, मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचे आमदार राहुल आवाडे यांनी सांगितले. त्यावर आरोग्यमंत्री आबिटकर यांनी तत्काळ जिल्हाशल्य चिकित्सक व वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी चर्चा करून आठ दिवसांत याठिकाणी प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800