इचलकरंजीत महाविकास आघाडीचा स्मार्ट मीटर योजनेला विरोध; निर्णय रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत महाविकास आघाडीचा स्मार्ट मीटर योजनेला विरोध; निर्णय रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

इचलकरंजी:
महावितरण कंपनीकडून ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या निर्णयाला महाविकास आघाडीने तीव्र विरोध दर्शवत हा निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी महावितरण आणि राज्य सरकारला निवेदन दिले असून, ग्राहकहिताला प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीने निवेदनात म्हटले आहे की, ३०० युनिट्सपर्यंत वीज वापरणाऱ्या लहान घरांवर आणि व्यापाऱ्यांवर स्मार्ट प्रीपेड मीटर बसवल्यामुळे अनावश्यक आर्थिक भार पडणार आहे. याशिवाय, स्मार्ट मीटर बसवण्यासाठी करण्यात येणारा खर्च वीज ग्राहकांवर लादण्याचा प्रयत्न हा अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महावितरणकडून प्रति मीटर ११,१०० इतका खर्च करण्यात येणार असून त्याचा बोजा वीजदरातून ग्राहकांकडून वसूल होणार असल्याने याचा भार जनतेवर पडणार आहे
वीज कायद्याच्या तरतुदींनुसार कोणत्याही ग्राहकाचे मीटर बदलण्यासाठी त्याची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, महावितरण कंपनीने ही तरतूद पायदळी तुडवून जबरदस्तीने मीटर बसवण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. त्यामुळे, स्मार्ट मीटर बसवण्याची योजना पूर्णतः रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर महाविकास आघाडीतील काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शशांक बावचकर,संजय कांबळे,राहुल खंजिरे,मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके,प्रकाश मोरबाळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे,शिवसेनेचे सयाजी चव्हाण, समाजवादी पक्षाचे जाविद मोमीन,समाजवादी प्रबोधिनीचे प्रसाद कुलकर्णी,कॉ भरमा कांबळे, आपचे प्रकाश सुतार, शेतकरी कामगार पक्षाचे शिवाजी साळुंखे,लाल निशाण पक्षाचे सुनिल बारावडे,सदा मलाबादे,अजित मिणेकर, यांच्या सह्या आहेत.
तीव्र आंदोलनाचा इशारा-
महाविकास आघाडीने स्पष्टपणे म्हटले आहे की, स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय तातडीने रद्द केला नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या या निर्णयाला पाठिंबा देणार नाही असे नमूद करत महावितरण कंपनीने स्मार्ट मीटर योजनांमध्ये बदल करताना ग्राहकांच्या संमती आणि कल्याणाचा विचार करावा अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More