श्रीमती अंशू सिन्हा यांच्या नियुक्तीचे महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाकडून स्वागत
मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव पदी श्रीमती अंशू सिन्हा (आय.ए.एस.) यांची नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाने त्यांचे स्वागत व अभिनंदन केले.
महासंघाचे अध्यक्ष श्री. अशोकराव स्वामी, कार्यकारी संचालक रामचंद्र मराठे, व सचिव संभाजी देसाई यांनी भेट घेऊन श्रीमती सिन्हा यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी महासंघाने राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्राच्या विकासासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
महासंघाच्या प्रतिनिधींनी श्रीमती सिन्हा यांच्याकडे वस्त्रोद्योगातील चालू समस्या मांडत, उद्योगाच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या धोरणात्मक उपाययोजनांची गरज असल्याचे सांगितले. त्यांच्या अनुभव आणि कार्यक्षम नेतृत्वामुळे वस्त्रोद्योग क्षेत्राला नवीन दिशा मिळेल, अशी आशा महासंघाने व्यक्त केली.
या भेटीत वस्त्रोद्योग क्षेत्राच्या व्यापक हितासाठी पुढील काळात सकारात्मक पावले उचलली जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800