अभय चषक’ क्रिकेट स्पर्धेत डी के ए एस सी कॉलेजची हॅटट्रिक,विजयी चषकाचे महाविद्यालयात जल्लोषात स्वागत.
इचलकरंजी:
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे, कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभय चषक स्टाफ क्रिकेट स्पर्धेमध्ये डी के ए एस सी महाविद्यालय सलग तिसऱ्या वर्षी अजिंक्य होत हॅट्ट्रिक केली. सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवल्यानंतर या विजयी चषकाचे महाविद्यालयात पारंपारिक वाद्याच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. कोल्हापूर येथील रुईकर कॉलनी मैदान व पॅव्हेलियन ग्राऊंड व शिवाजी विद्यापीठ येथे संपन्न झालेल्या या क्रिकेट स्पर्धेत संस्थांतर्गत एकूण ३९ संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात विवेकानंद संस्था हेड ऑफिस संघाविरुद्ध सहा षटकात ९७ ही धावसंख्या उभारून संस्था हेड ऑफिस संघाला ४९ धावसंख्येवर रोखून विजय मिळवला.
डी के ए एस सी च्या विजेत्या संघाला संस्था सीईओ मा. श्री. कौस्तुभ गावडे साहेब व मान्यवरांच्या हस्ते विजयी चषक देण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर, कर्णधार प्रा. विनायक भोई यांनी हा विजेता चषक मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला. संघातील खेळाडू प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर यांना उत्कृष्ट गोलंदाज व प्रा. मुजफ्फर लगीवाले यांना मालिकावीर या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. विजयी संघाचे चषकासह महाविद्यालयात जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रा. मुजफ्फर लगीवाले यांनी सलग दुसऱ्या वर्षी मालिकाविराचा बहुमान मिळवला. संघातील सर्वच खेळाडूंचे प्राचार्यांनी गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले.
या महाविद्यालयाच्या संघात प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर, प्रा. विनायक भोई (कर्णधार), प्रा. मुजफ्फर लगीवाले, प्रा. विजय सूर्यवंशी. प्रा स्वप्नजीत मुळीक, प्रा. सोमनाथ करांडे, प्रा. वरूण पाटील, प्रा. रघुनाथ शिरढोणे, प्रा. ऋषिकेश माने, प्रा. अभिनंदन गोरवाडे, प्रा. अनिकेत पाटील, प्रा. रामदास भरसट, प्रा. जुबेर खतीब, प्रा. सचिन जाधव, प्रा. अनिल जांभळे, प्रा. सुनील भोसले, प्रा. रोहित शिंगे( संघ व्यवस्थापक) प्रा. जयकुमार करके (प्रशिक्षक) या गुरुदेव कार्यकर्त्यांचा समावेश होता.
महाविद्यालयातील विजयी जल्लोषाच्या वेळी प्राचार्य डॉ. मणेर म्हणाले की, “संस्था कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब यांच्या नावाने संपन्न होत असलेली ही स्पर्धा सलग तीन वर्ष आपल्या महाविद्यालयाने जिंकली ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.” तर कर्णधार प्रा. विनायक भोई यांनी “संस्था सीईओ मा. कौस्तुभ गावडे सर यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या या क्रिकेट स्पर्धेमुळे आम्हाला हे आनंदाचे क्षण अनुभवता आले व संस्थेतील विविध शाखांमधील गुरूदेव कार्यकर्ते व सेवकांना एकत्रित येण्याची संधी मिळाली.” अशा भावना व्यक्त केल्या. या विजय जल्लोषावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800