डी के ए एस सी महाविद्यालयांमध्ये विश्व हिंदी दिन साजरा
इचलकरंजी:
येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने आयोजित 10 जानेवारी विश्व हिंदी दिवस मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला. यावेळी हिंदी विभागाच्या वतीने भित्तिपत्रिकेच उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या हस्ते करण्यात आले . श्रेष्ठ हास्य व्यंग्य साहित्यकार हरिशंकर परसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले .प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस एम मणेर विश्व हिंदी दिन जगा मध्ये हिंदी भाषे चा प्रसार प्रचार वाढावा म्हणून विश्व हिंदी दिन साजरा केला जातो हरिशंकर परसाई यांच्या जन्मशताब्दी निमित्त ते म्हणाले की हरिशंकर परसाई यांनी व्यंग लेखन करुन समाजातील पांखड, अंतर्विरोध आणि विसंगती वाचकांच्या समोर आणल्या व्यंग चा उद्देश सामाजिक विषमता नष्ट करणे व्यंग चा अर्थ उपहास, विडंबन आहे, ताना माराने आहे परसाई यांचे प्रसिद्ध निबंध बेचारा भला आदमी, प्रेम की बिरादरी, प्रेमचंद के फटे जूते यातून त्यांनी समाजातील विसंगती वर व्यक्ती च्या अंतर्विरोध स्वभावा वर प्रकाश टाकला आहे प्राचार्या नी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना विश्व हिंदी दिनाच्या शुभेच्छा देत हरिशंकर परसाई यांच्या हास्य व्यंग साहित्यिक कृतींचा अनेक उदाहरणाच्या माध्यमातून परिचय करून दिला. त्याचप्रमाणे विश्व हिंदी दिनाचे औचित्य राखून हिंदी विभागाने अंताक्षरी स्पर्धेचे आयोजन देखील केले. विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या स्पर्धेला प्रतिसाद देऊन हिंदी भाषे विषयीची आपली आपुलकीची भावना व्यक्त केली. या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ. अंजली उबाळे यांनी केले.आभार प्राध्यापिका किशोर टोणपे यांनी मांडले सूत्रसंचालन प्राध्यापिका सफिया मुल्ला यांनी केले. त्याचप्रमाणे अंताक्षरी स्पर्धेच्या परीक्षक म्हणून प्राध्यापिका डॉ.रीता रॉड्रिक्स व प्राध्यापिका डॉ. पद्मश्री वाघमारे यांनी अंताक्षरी स्पर्धेचे मूल्यमापन केले. या कार्यक्रमा करिता विद्यार्थी विद्यार्थिनी त्याचप्रमाणे प्राध्यापक व प्राध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800