संजय गांधी लाभार्थ्यांचे साडेपाच कोटी रुपये खात्यात जमा :. संगांनियो समिती अध्यक्ष अँड.अनिल डाळ्या
इचलकरंजी
संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना या सर्व निराधार लाभार्थ्याचे माहे आक्टोंबर नोव्हेंबर या दोन महिन्याचे लाभार्थी अनुदान रक्कम रुपये साडेपाच कोट के डी सी बँक व पोस्टाच्या खात्यात जमा झाले आहे. आता येणारे अनुदान हे कोल्हापूर कलेक्टर ऑफिस, तहसील ऑफिस, के डी सी बँक, व त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत होते पण आता येथून पुढे येणारेअनुदान शासनाने महाडीबीटी प्रणाली अंतर्गत शासनाकडून येणारे अनुदान हे डायरेक्ट लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होणार आहे. मधील सर्व पायऱ्या वगळल्यामुळे लाभार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही.तसेच केडीसी व पोस्टातील गर्दी व लाभार्थ्यांची रांग कमी होऊन त्यांची ससेहोलपट थांबणार आहे.त्यासाठी बँक खात्याला आधार लिंक करून घेणे बंधनकारक आहे अशी माहिती संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष अनिल डाळ्या यांनी दिली व सर्व लाभार्थ्यांनी आपले बँक खाते मोबाईल लिंक करावे असे आवाहन केले आहे. हे अनुदान मिळवण्यासाठी आमदार राहुल आवाडे,खासदार धैर्यशील माने,माजी आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेशराव हाळवणकर साहेब यांचे सहकार्य लाभले असल्याचे समितीचे अध्यक्ष अनिल डाळ्या यांनी सांगितले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800