डी के टी ई च्या अनंतराव भिडे विद्या मंदिर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार.
इचलकरंजी:
डी के टी ई च्या अनंतराव भिडे विद्या मंदिर इंग्रजी माध्यमातील इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे आठवडी बाजार भरवला.
दिनांक १० जानेवारी रोजी सौ . इंदुमती कल्लाप्पाण्णा आवाडे शैक्षणिक संकुल च्या प्रांगणा मध्ये हा शुक्रवारचा बाजार मोठ्या उत्साहात भरविण्यात आला. बाजाराचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य माननीय श्री. अभिजित कोथळी सर यांच्या हस्ते झाले.
या बाजार भरविण्यामागील प्रमुख उद्देश असा की विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये व व्यवहारज्ञान वाढविणे, तसेच गणिताच्या मूलभूत संकल्पना वाढीस लावणे हा होता.
या उपक्रमात भाजी विक्रेते म्हणून जवळजवळ 300 विद्यार्थी सहभागी झाले होते तर भाजी खरेदीसाठी अंदाजे ५०० ते ६०० पालक सहभागी झाले होते.
भाजी माझी विकताना विद्यार्थ्यांचा उत्साह अवर्णनीयच होता तर भाजी खरेदी करून पालक त्यांना प्रोत्साहन देत होते.
या बाजाराचे स्वरूप पाहून असे वाटले की शुक्रवारचा बाजार येथेच भरला आहे. बाजारात विविध भाज्या, फळे, कडधान्ये व मसाले यांचा समावेश होता, आणि विद्यार्थ्यांनी केलेली भाजी विक्रेत्यांची वेशभूषा विशेष आकर्षण ठरली.
पालकांनी व प्रमुख पाहुण्यांनी या उपक्रमाचे व्यवस्थापन , नियोजन तसेच विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांना कृतीयुक्त अनुभव देणारा व स्वावलंबनाचे धडे देणारा अशा प्रकारचा आठवडी बाजार भरविल्यामुळे अनंतराव भिडे विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ सुनीता केटकाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी घेतलेल्या परिश्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800