पंचगंगा नदीतील गाळ काढण्याच्या नावाखाली बेकायदेशीररित्या वाळू उपसा-कारवाईची शशांक बावचकरांची मागणी
इचलकरंजी :
पंचगंगा नदीतील गाळ काढण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या कामाचा गैरफायदा घेत काही वाळू व्यापारी बेकायदेशीर वाळू उपसा करून शासनाच्या महसुलावर दरोडा टाकत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शशांक बावचकर यांनी केला आहे.या प्रकरणात संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करत प्रांताधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे.
इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांनी महापुराचा धोका कमी करण्यासाठी पंचगंगा नदीतील गाळ काढण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी याला तातडीने मान्यता दिली आणि कामाला सुरुवात झाली. मात्र, गाळ काढण्याच्या नावावर शेतकऱ्यांची नावे नोंदवून वाळू उपसा करण्याचा बेकायदेशीर व्यवसाय जोरात सुरू असल्याचे स्पष्ट झाले वाळू उपशाच्या नावाखाली शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत आहे. एका सहकारी संस्थेमार्फत गाळ काढण्याच्या नावाने वाळू उपशाचे बेकायदेशीर काम सुरू असल्याचा आरोप आहे,महापुराचा धोका कमी करण्याच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जात आहे असे आरोप निवेदनात करण्यात आले असून बावचकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी प्रांताधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच या प्रकरणात हलगर्जी करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी, असेही म्हटले आहे.
नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण
या बेकायदेशीर प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शासनाने यावर तत्काळ लक्ष घालून कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रशासनाची भूमिका आणि यावर होणारी कारवाई याकडे सर्वांचे

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800