देशाला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून देण्याचे कार्य खेळाडू करत असतात- प्रा. मेजर एम. जी. गायकवाड.डीकेएएससी महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य क्रीडादीन संपन्न…
इचलकरंजी:
येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयात महाराष्ट्राचे महान सुपुत्र आणि भारताला वैयक्तिक स्वरूपाचे पहिले ऑलम्पिक पदक मिळवून देणारे ऑलम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांची जयंती अर्थात महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे प्रा. मेजर एम. जी. गायकवाड हे उपस्थित होते. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी खेळाडू यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी बोलताना प्रा. मेजर गायकवाड म्हणाले, ” कोणत्याही खेळामध्ये अफाट संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नाही. सातत्यपूर्ण कष्ट केल्यास खेळामध्ये यश अशक्य सुद्धा नाही. कला असो वा खेळ त्यामध्ये साधना, उपासना आणि त्याला सातत्याची जोड असते. खेळाचेही तसेच आहे. कोणत्याही देशाचा जागतिक पातळीवर होणारा गौरव हा त्या देशातील खेळाडूंनी मिळवलेल्या यशावर बऱ्याच अंशी अवलंबून असतो. ज्या काळात आणि ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये खाशाबांनी ऑलिंपिक मध्ये यश मिळवले तो संघर्ष प्रचंड मोठा होता त्यातून अलीकडच्या सर्वच खेळाडूंनी प्रेरणा घेतली पाहिजे.” अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. मणेर म्हणाले, ” मोबाईल, कॉम्प्युटर आणि सोशल मीडियाचा अतिरेक झालेल्या काळात मूले मातीत खेळायला विसरून गेलेली आहेत. तुम्ही कोणत्याही खेळाच्या माध्यमातून ग्राउंड वरती जितके खेळाल, जितके यश अपयश पचवाल ती बाब विद्यार्थ्यांना खेळाडूंना जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर नव्याने उभारणी देत राहील. ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव यांची जिद्द आणि खेळातील कसं पाहून त्यावेळी त्यांचे प्राचार्य डॉ. खर्डेकर यांनी स्वतःचं घर विकून सात हजार रुपये खाशाबा यांना दिले होते. सांगण्याचे तात्पर्य तुमच्या क्षमता असेल तर तुमच्या पाठीमागे माणसं उभी राहतात पण तुम्ही स्वतःची क्षमता सिद्ध केली पाहिजे.” यावेळी महाविद्यालयाचे माजी खेळाडू, माजी विद्यार्थी मा. विजयसिह राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जिमखाना विभागाच्या भित्तीपत्रिकेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे प्रा.मेजर एम. जी. गायकवाड यांच्या हस्ते झाले.
संस्था प्रार्थना आणि दीपप्रज्वलनाने सुरू झालेल्या या समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. मुजफ्फर लगिवले यांनी तर मान्यवरांचा परिचय लेफ्टनंट प्रा. विनायक भोई यांनी करून दिला. आभार विद्यार्थी आनंद गुलगुंज याने तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहित शिंगे यांनी केले. यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800