कुरुंदवाड येथे संविधान सन्मान परिषद संपन्न.
इचलकरंजी:
कुरुंदवाड येथे रविवार ता.१९ जानेवारी रोजी ‘ संविधान सन्मान परिषद २०२५ संपन्न झाली. या परिषदेचे उद्घाटक व प्रमुख वक्ते मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील होते. अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. शरद गायकवाड होते. यावेळी डॉ.एस. के.माने यांच्या ‘भारताचा सत्य इतिहास पुराव्यासह ‘ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाला प्रसाद कुलकर्णी यांची प्रस्तावना आहे. या परिषदेत न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील ,प्रसाद कुलकर्णी ,शरद गायकवाड, डॉ.एस.के. माने, बाबासाहेब नदाफ आणि या परिषदेचे निमंत्रक ऍड. ममतेश आवळे यांची भाषणे झाली. या परिषदेत रामदास कोळी, संतोष आठवले यांच्यासह काही मान्यवराना संविधान रक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला ऍड .सुशांत पाटील, दादासाहेब पाटील, डॉ. आर.बी.जाधव ,सदाशिव सुभेदार ,रामदास मधाळे ,महिपती बाबर, प्रमोद पाटील, जयपाल बलवान,डॉ. शशिकांत पाटील, पांडुरंग गायकवाड , अजित मिणेकर, बापूसाहेब घुले आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कुमार विद्या मंदिर च्या प्रांगणात झालेल्या या संविधान सन्मान परिषदेचे शुभम कांबळे व साहिल शेख यांनी सूत्रसंचालन केले तर विश्वास कांबळे यांनी आभार मानले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









