कोल्हापूर जिल्ह्यात महिला आघाडीचे काम कौतुकास्पद : खा.धैर्यशील माने महिला आघाडीच्यावतीने नुतन पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र प्रदान

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कोल्हापूर जिल्ह्यात महिला आघाडीचे काम कौतुकास्पद : खा.धैर्यशील माने
महिला आघाडीच्यावतीने नुतन पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र प्रदान
कोल्हापूर:
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात शिवसेनेची बांधणी जोमाने सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही महिला आघाडीचे काम सक्षमपणाने सुरु आहे. ते अधिक मजबुत करण्यासाठी प्रयत्नशील रहा, असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केले.
शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने तसेच खासदार धैर्यशील माने, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी जिल्हाप्रमुख वैशाली डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीची बांधणी व पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप रुईकर कॉलनी येथे पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी उपसरपंच किरण चौगुले यांच्या पत्नी सुधा चौगुले यांची शिवसेना महिला आघाडी उपतालुका प्रमुखपदी तसेच महिला बचत गटाच्या पुनम शीतल खाडे यांची शिवसेना महिला आघाडी शिरोली विभाग प्रमुखपदी, शिरोळ तालुका कार्याध्यक्षपदी स्वाती भापकर, जयसिंपूर शहर प्रमुखपदी प्रियांका धुमाळ, नृसिंहवाडी शहर प्रमुखपदी सुजाता साळुंखे, शिरढोण शहरप्रमुखपदी सारीका अरुण गायकवाड, शिरोळ शहरप्रमुखपदी हेमलता शिवाजीराव जाधव, जयसिंगपूर शहर समन्वयकपदी राणी संजय तिवडे, आळते शाखाप्रमुखपदी शुभांगी प्रशांत मगदूम आदींची निवड करण्यात आली. यावेळी खा.धैर्यशील माने, महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशाली डोंगरे यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी हातकणंगले तालुका सरचिटणीस वृषभनाथ पाटील, शिवसेना इचलकरंजी शहर प्रमुख भाऊसो आवळे, विभागप्रमुख सुरेखा मांडवकर, स्वाती कांबळे यांच्यासह सर्व महिला आघाडीच्या पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More