खाद्य संस्कृती ही माणसाना जोडणारी संस्कृती-खा. धैर्यशील माने
इचलकरंजी:
“आज पाककला आणि खाद्य संस्कृती ही महाराष्ट्राची ओळख बनलेली आहे. ही संस्कृती राज्यात आणि देशभरात वाढत आहे तसेच ती माणसांना आणि परिवारांना जोडणारी संस्कृती बनली आहे. आज भारतीय खाद्यपदार्थ जगभरात मिळतात त्याचबरोबर जगभरातील पदार्थ आपल्याकडे मिळतात. अशाच प्रकारे सर्व समाजाला एकत्र आणणारा अन्न उत्सव हा अभिनंदनीय उपक्रम आहे” अशा आशयाचे उदगार खासदार धैर्यशील माने यांनी काढले.
येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आयोजित ‘अन्न उत्सव’ या उपक्रमाचे प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर चितळे डेअरीचे गिरीश चितळे, भिलवडी आणि दावत राईसचे सुभाष छाबडा, इचलकरंजी हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनीही आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना “सध्या या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद पाहता, पुढील काही वर्षातच हा उपक्रम आणखी मोठे स्वरूप धारण करेल हे निश्चित आहे” अशा प्रकारचे उदगार काढले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले तर प्रोजेक्ट चेअरमन ॲड. शिवकुमार धड्ड यांनी प्रास्ताविक करताना उपक्रमाची सर्व माहिती दिली. यावेळी क्लबचे सेक्रेटरी नागेश दिवटे यांच्या हस्ते सर्व पाहुण्यांना बुके प्रदान करण्यात आले. उदघाटन कार्यक्रमप्रसंगी खासदार माने यांच्या हस्ते, विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींना गुलाब पुष्प प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रोजेक्ट सेक्रेटरी शीतल भरते यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन संजय होगाडे यांनी केले. येथील केएटीपी ग्राउंड या प्रशस्त जागेत हा उपक्रम सुरू असून तो २७ जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे. उदघाटन कार्यक्रमप्रसंगी निमंत्रित आणि रोटरी परिवारातील सदस्य उपस्थित होते.
फोटो-
अन्न उत्सव उदघाटनप्रसंगी खासदार धैर्यशील माने, गिरीश चितळे, सुभाष छाबडा आणि संयोजक पदाधिकारी…
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







