श्रीमंत गंगामाई प्रशालेची आंतरराष्ट्रीय खो-खो खेळाडू वैष्णवी पोवार हिची भव्य मिरवणूक संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीमंत गंगामाई प्रशालेची आंतरराष्ट्रीय खो-खो खेळाडू वैष्णवी पोवार हिची भव्य मिरवणूक संपन्न.

इचलकरंजी
नवी दिल्ली येथे 13 ते 19 जानेवारी, 2025 दरम्यान झालेल्या पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत भारताचा महिला संघ विश्वविजेता ठरला. भारतीय महिला खो-खो संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारी श्री ना. बा. एज्युकेशन सोसायटी संचलित, श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी, कोल्हापूर खो-खो असोसिएशनची नोंदणीकृत खेळाडू व राजमाता जिजाऊ खो-खो संघ (महिला) या क्रीडा मंडळाची खेळाडू आणि या मंडळाचे प्रशिक्षक श्री तात्यासाहेब कुंभोजे यांची शिष्या कु. वैष्णवी बजरंग पोवार हिची इचलकरंजी येथे जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली.
सध्या इ. 12 वी मध्ये शिकत असणाऱ्या वैष्णवीचे तिच्या प्रशालेकडून जंगी स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतशबाजी करीत उघड्या जीप मधून तिची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. तिच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोळी काढली होती तसेच डिजिटल फलक लावले होते.
मिरवणुकीमध्ये वैष्णवी सोबत तिची आई सौ. माधुरी पोवार, वडील श्री बजरंग पोवार, प्रशिक्षक श्री तात्यासाहेब कुंभोजे हे होते.
    शिवतीर्थ येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. वैष्णवीच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी तिच्या सत्कारासाठी
माजी आमदार श्री. प्रकाश अण्णा आवाडे, प्रांताधिकारी सौ. मोसमी चौगुले, डीवाय. एस.पी. श्री समीरसिंह साळवे, कोल्हापूर जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. श्री. एकनाथ आंबोकर, जिल्हा क्रीडाधिकारी सौ. नीलिमा आडसूळ, कोल्हापूर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्री राजन उरुणकर, सन्मती सहकारी बँकेचे चेअरमन श्री सुनील पाटील, श्री ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री श्रीनिवासजी बोहरा, ट्रेझरर श्री महेशजी बांदवलकर, गंगामाईच्या स्कूल कमिटीचे चेअरमन श्री मारुतराव निमणकर, विश्वस्त श्री अहमद मुजावर, विश्वस्त श्री श्रीकांत चंगेडिया, विश्वस्त श्री सुरेंद्रकुमार बांगड, ज्येष्ठ क्रीडा संघटक श्री शेखर शहा, इचलकरंजी महानगरपालिकेचे क्रीडाधिकारी श्री संजय शेटे, उपक्रिडाधिकारी श्री संजय कांबळे, क्रीडा पर्यवेक्षक श्री सचिन खोंद्रे, जिल्हा क्रीडा कार्यालयाचे अधिकारी श्री सुधाकर जमादार, सौ. मनीषा पाटील, कोल्हापूर खो-खो असोसिएशनचे खजिनदार श्री हरिहर होगाडे, संचालक श्री श्रीशैल कित्तुरे, राजर्षी शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री शंकर पोवार, शिक्षण विभागाचे अधीक्षक श्री प्रवीण फाटक, गोविंदराव हायस्कूल व ज्युनि. कॉलेजचे मुख्याध्यापक श्री एस. एस. तेली, उपमुख्याध्यापक श्री सी. पी. कोरे, क्रीडा विभागप्रमुख श्री बी. एस. माने, क्रीडा शिक्षक श्री अमित कागले उपस्थित होते.
 मिरवणुक मार्गावर वैष्णवीचा सत्कार शिवतीर्थ रिक्षा मंडळ, जयहिंद मंडळ, मर्चंटस् को-ऑपरेटिव्ह बँक, कल्लाप्पाण्णा आवाडे जनता सहकारी बँक, व्यंकटराव हायस्कूल, बिरदेव वाचनालय, गोविंदराव हायस्कूल व ज्युनि. कॉलेज, व्यंकटेश महाविद्यालय, श्री ना. बा. बालमंदिर,श्री. ना. बा. विद्यामंदिर यांच्यासह विविध सहकारी संस्था, रिक्षा मंडळे, शैक्षणिक संस्था यांनी केला.
     शहराच्या मुख्य मार्गावरून मिरवणूक प्रशालेत आल्यानंतर तिचा सत्कार सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. सुरुवातीला श्रीमंत गंगामाई माईसाहेब यांच्या पुतळ्यास सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वागत गीत सौ. ए. ए. रानडे  व संगीतमंचच्या विद्यार्थिनींनी सादर केले. आपल्या स्वागत व प्रास्ताविकात प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ ए. एस. काजी यांनी सर्वांचे स्वागत करून, वैष्णवीचे अभिनंदन केले. बौद्धिक विकासाबरोबरच विद्यार्थिनींच्या सुप्त गुणांना वाव देणारी प्रशाला म्हणजे आमची गंगामाई. आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करून आपले योग्य ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थिनींनी तिची प्रेरणा घेऊन वाटचाल करावी अशा सदिच्छा त्यांनी दिल्या. प्रशालेच्या वतीने वैष्णवीला सन्मानपत्र फेटा व शाल देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर तिच्या आई सौ. माधुरी पोवार व वडील श्री.बजरंग पोवार यांचाही सत्कार करण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. नीलिमा अडसूळ यांनी आपल्या मनोगतात मुली म्हणजे आई-वडिलांचा स्वाभिमान असतात. सध्या कोणत्याच क्षेत्रात महिला कुठे कमी नाहीत. आपली संगत आपले भविष्य घडविते. खेळाडू हा खेळाला मोठे करतो. असे सांगून तिच्या यशात सहभागी असणाऱ्या सर्व कुटुंबीयांचे व प्रशालेचे अभिनंदन केले.
         कोल्हापूर खो-खो असोसिएशन संघाचे अध्यक्ष श्री. राजन उरुणकर यांनी वैष्णवीच्या परिश्रमाचे कौतुक करून, यश टिकवायचे असल्यास सातत्याने कठोर परिश्रम करणे महत्त्वाचे आहे असे मनोगत व्यक्त केले. आपल्या सत्काराला उत्तर देताना वैष्णवीने आपले आई-वडील त्याचबरोबर संस्था, सर्व क्रीडा शिक्षक, शाळेतील सर्व शिक्षक,प्रशिक्षक,मार्गदर्शक,मैत्रिणी या सर्वांचे ऋण व्यक्त केले.
       आपल्या अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे अध्यक्ष श्री श्रीनिवासजी बोहरा यांनी संस्था व शाळेबरोबरच आपल्या इचलकरंजी वस्त्रनगरीचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावल्याबद्दल वैष्णवीचे अभिनंदन करून, तिच्या भावी यशासाठी तिला शुभेच्छा दिल्या.
      यावेळी ज्येष्ठ क्रीडा संघटक श्री.सी. एम. शहा, प्रशिक्षक श्री तात्यासाहेब कुंभोजे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ .ए.एस.काजी, उपप्राचार्य व्ही.जी.पंतोजी उपमुख्याध्यापक व्ही. एन.कांबळे पर्यवेक्षक एस.व्ही.पाटील, एस. एस.कोळी, क्रीडा शिक्षक डॉ. राहुल कुलकर्णी, सौ. व्ही. के. पाटील, के. ए. पाटील, सौ. एस.एस. बाबर यांनी केले. कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षक बंधू -भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. आभार उपमुख्याध्यापक श्री. व्ही. एन. कांबळे यांनी मानले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More