मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्षाचे जिल्हा अधिवेशन उत्साहाने संपन्न
इचलकरंजी :
मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्षाचे 11 वे जिल्हा अधिवेशन इचलकरंजी येथील समाजवादी प्रबोधिनी येथे पक्षाच्या राज्य कमिटीच्या निरीक्षणाखाली उत्साहाने संपन्न झाले,
सकाळी 11 वाजता कॉ. दत्ता माने यांच्या हस्ते झेंडावंदन झाले त्यानंतर अधिवेशनाचे स्वागत प्रास्ताविक कॉ. भरमा कांबळे यांनी केले आणि अधिवेशणाचे कामकाज करण्यासाठी सुभाष जाधव, भरमा कांबळे आणि चंद्रकला मगदूम या तीन लोकांचे अध्यक्षीय मंडळाची घोषणा केली,
पहिल्यांदा अध्यक्षीय मंडळाचे वतीने श्रद्धांजलीचा ठराव मांडला, आणि अधिवेशनाचे उदघाटन पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ.सुनील मालुसरे यांच्या भाषणाने झाले, ते आपल्या भाषणात म्हणाले ” आज देशात आर एस एस आणि भाजपचे सरकार गेली 10 वर्षे राज्य करीत आहे, मात्र देश प्रचंड कर्जबाजारी झाला आहे, देशावरील कर्जाचा बोजा तिप्पट वाढला आहे, कोविड काळापासून देशातील अनेक उद्योग बंद पाडून कोट्यावधी कामगारांना बेरोजगार केले आहे, आज भाजपाला विरोध करायची ताकद फक्त कम्युनिष्ठ पक्षातच आहे, 2023 च्या पक्ष अधिवेशनात भाजपला रोखायचा निर्णय आपल्या पक्षाने घेतला होता त्याला अनुसरून देशभर इंडिया आघाडीचा प्रयोग कॉ. सीताराम येचुरी यांच्या मार्फत राबविण्यात आला आणि त्याला बऱ्यापैकी यश देखील आले, म्हणून येणाऱ्या मदुराई येथील अधिवेशनात पुन्हा एकदा देशातील राजकारणाला काय कलाटणी द्यायची याचा निर्णय होणार आहे, त्यासाठी आपल्या कार्यकर्ते यांनी भाजपच्या धर्मांध आणि जातीयवादी राजकारणाला विरोध करण्यासाठी तयार रहावे व पक्ष बळकट करावा असे आवाहन करणेत आले.
या अधिवेशनात गेल्या तीन वर्षाचा अहवाल पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी कॉ. A b पाटील यांनी मांडला तर कामगार आघाडी, किसान आघाडी, महिला आघाडी आणि शेतमजूर आघाडीचे रिपोर्ट त्या त्या संघटना प्रमुखांनी मांडले,
या अहवालावर उपस्थित पैकी 17 कार्यकर्ते यांनी सूचना आणि दुरुस्त्या मांडल्या आणि अहवाल एकमताने मंजूर करणेत आला,
या अधिवेशनात पाच वेगवेगळे ठराव मांडण्यात आले त्यामध्ये सर्व धंद्यातील कामगारांच्या किमानवेतनाची प्रभावी अंमलबजावणी करा, महिलावरील वाढत्या अत्याचारविरोधी कडक कायदे करा, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दुप्पट भाव मिळाला पाहिजे, शेतमजूरासाठी केंद्रीय कायदा आणि स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करा, गोवा नागपूर शक्तिपीठ मार्ग रद्द करा, स्मार्ट मीटर सक्ती बंद करा वगैरे ठराव अधिवेशनाने टाळयांच्या कडकडाटात मंजूर करण्यात आले,
शेवटी पुढील तीन वर्षाकारिता 17 लोकांची जिल्हाकमिटीची एकमताने निवड करण्यात आली, त्यामध्ये जिल्हासेक्रेटरी म्हणून डॉ. सुभाष जाधव, कॉ. भरमा कांबळे, ए बी पाटील, शिवाजी मगदूम, सदा मलाबादे, विकास पाटील, चंद्रकला मगदूम, मुमताज हैदर, अमोल नाईक, दिनकर आदमापुरे, अप्पा परीट, विवेक गोडसे, मोहन गिरी, आशिष चव्हाण, सुरेश कुरणे यांचा समावेश करणेत आला.
या अधिवेशनाला पक्षाचे राज्य निरीक्षक म्हणून कॉ. उदय नारकर राज्य सेक्रेटरी, कॉ. एम एच शेख,कॉ. अजित नवले, किसन गुजर यांनी पुढील तीन वर्षात जिल्हा कमीट्या च्या मदतीने पक्ष कसा बळकट करायचा याचे अचूक मार्गदर्शन वरील सर्व नेत्यांनी केले.
शेवटी आभार नूतन सेक्रेटरी डॉ. सुभाष जाधव यांनी मांडून अधिवेशनाचा समारोप झाला

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800